11 सप्टेंबरला आंतर केंद्रीय मंत्रालयीन पथकाचा दौरा

0
60
Advertisements

चंद्रपूर: गोसीखुर्द प्रकल्पामधून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे ब्रह्मपुरी येथील अनेक गावांमध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली होती. या पूरग्रस्त भागाची पहाणी व आढावा घेण्यासाठी आंतर केंद्रीय मंत्रालयीन पथक 11 सप्टेंबर रोजी ब्रह्मपुरी तालुक्याचा दौरा करणार आहे. अधिकाऱ्यांच्या समवेत पाहणी करून ते नागरिकांशी थेट संवाद साधणार आहेत.

आंतर केंद्रिय मंत्रालयीन पथकाचा पाहणी दौरा पुढीलप्रमाणे आहे. सायंकाळी 4 वाजता ब्रह्मपुरी येथील शासकीय विश्रामगृहात  (वनविभाग)  आगमन होणार आहे. सायंकाळी 4.15 वाजता मौजा बेलगाव, सायंकाळी 4.50 वाजता  मौजा बेटाळा, सायंकाळी 5.30 वाजता मौजा किन्ही,  सायंकाळी 5.45 वाजता मौजा गांगलवाडी, बरडकिन्ही येथे अधिकाऱ्यांच्या समवेत नुकसानग्रस्त शेतीची पाहणी करुन नागरिकांशी संवाद साधणार आहेत. सायंकाळी 6.15 वाजता गडचिरोली कडे प्रयाण व शासकीय विश्रामगृह गडचिरोली येथे मुक्काम असणार आहे.

Advertisements

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here