मोदी सरकार रोजगार दो….! वर्षाला 2 कोटी रोजगार गेले कुठे?

0
49
Advertisements

गडचांदूर/सैय्यद मूम्ताज़ अली:-
युवकांसाठी वर्षाला 2 कोटी रोजगाराची निर्मिती करू असे आश्वासन देऊन केंद्रात मोदी सरकार सत्तेवर आले.पण परिस्थिती मात्र विपरीत पहायला मिळत आहे.”मोदी सरकार रोजगार दो” अशी मागणी कोरपना युवक काँग्रेस कमिटीच्या वतीने तहसीलदार यांना 8 सप्टेंबर रोजी दिलेल्या निवेदनातून करण्यात आली असून भारतात सर्वात जास्त रोजगार निर्मिती करणाऱ्या कृषी व सूक्ष्म लघु,मध्यम उद्योग क्षेत्राला नोटबंदीमुळे मोठा फटका बसला.करोडो रोजगार नष्ट झाले.वस्तू सेवा कराच्या कुटीर व लघू मध्यम क्षेत्राचे आणि उद्योग धंद्याचे अक्षरशः कंबरडे मोडले.परिणामी मोठ्याप्रमाणात बेरोजगारी वाढली.
पंतप्रधान मोदी यांच्या 20 लाख करोडच्या पैकेज मधून बेरोजगार युवक, शेतकरी व लघु,मध्यम उद्योग क्षेत्र,यापैकी कोणत्याही घटकाला मदत झाली नाही. दरवर्षी 2 कोटी रोजगार निर्मितीचे आश्वासन देणार्‍या मोदी सरकारने आता याकडे लक्ष दिले पाहिजे.युवकांमध्ये निराशा पसरली आहे.आत्महत्येचे प्रमाण वाढत आहे. रोजगार निर्मितीची जबाबदारी ढकलून चालणार नसून तरूणांच्या हाताना काम नसल्याचे निवेदनात नमूद करत सरकारकडे आमची एकच मागणी आहे “रोजगार दो!” असे म्हटले आहे.
यासंबंधीचे निवेदन युकाँ कमिटीतर्फे तहसीलदार यांना देण्यात आले आहे.यावेळी युकाँ कोरपना तालुकाध्यक्ष शैलेश लोखंडे,राजूरा विधानसभा महासचिव विलास मडावी,युकाँ तालुका उपाध्यक्ष अतूल गोरे,गडचांदूर युकाँ शहराध्यक्ष रुपेश चुदरी,गणेश तुरणकर,प्रकाश मोहूर्ले, अल्पसंख्यांक शहराध्यक्ष निसार शेख, महासचिव विनोद मरसकोले कोरपना आदींची उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here