मित्रांसमोरचं झाला वाघाचा हल्ला

0
212
Advertisements

सावली : सकाळी उठून व्यायाम करण्यासाठी गेलेल्या बालकाला वाघाने उचलून नेल्याची घटना आज रोजी पहाटेच्या सुमारास घडली संस्कार सतीश बूरले 12 वर्ष असे मृतकाचे नाव असून तो कापसी येथील रहिवाशी होता. पावसाळा संपताच हिवाळी मोसमाला सुरुवात होते या निमित्याने अनेक लोक मार्निग वॉक व्यायामासाठी सकाळी फिरण्याकरिता गावा नजिक जात असतात आज रोजी सकाळी कापसी येथिल अंदाजे 20 लोक कापसी ते व्याहाळ मार्गे एक किमी अंतर फिरण्यासाठी गेले होते पैकी मृतक आणि त्याचा मित्र मंथन भांडेकर हे दोघेच समोर जाऊन व्यायाम करीत असताना रस्त्या लगत झुडपी जंगलात दबा धरून बसलेल्या वाघाने संस्कारवर हल्ला करून उचलून नेले भयभीत मित्राने बोंबाबोंब केली.
घटनेची माहिती होताच गावातील लोक धाऊन आले वनविभाग व पोलीस विभागाला माहिती देताच घटनास्थळी येऊन शोध मोहीम केली असता झुडपी जंगलात 1 किमी अंतरावर मृतकाचे शव मिळाले ते ताब्यात घेऊन बालकावर हल्ला करणारा पट्टेदार वाघ की बिबट्या याचा शोध सुरू असून सदरची घटना व्याहाळ उपक्षेत्रांतर्गत असून मृतक हा बुराले परिवारातील लहान मुलगा होता.
मोलमजुरी करणाऱ्या बूरले परिवारावर दुःखाचे डोंगर कोसळले असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे सदरच्या घटनेमुळे गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वाघाचा बंदोबस्त करून मृतकाचे कुटुंबाला आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here