कोठोडा(बू)गावकऱ्यांचा रेशन दुकानदारा विरूद्ध एल्गार

0
155
Advertisements

गडचांदूर/सैय्यद मूम्ताज़ अली:-
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनच्या काळात मागील 4 एप्रिल रोजी कोरपना तालुक्यातील कोठोडा यागावातील स्वस्त धान्य दुकान लगतच्या गावातील एकाकडे सोपविण्यात आले.निलंबनाला आज 6 महिन्यांचा काळ लोटत असून 5 अॉगस्ट रोजी जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी सदर दुकानदारास रेशन वाटप करण्याची परवानगी दिली.परंतु वास्तविक पाहता त्यांची चौकशी व्हायला पाहिजे तसे न होता सरळ त्यांना रेशन वाटण्यास परवानगी देण्यात आल्याचे कळताच लोकांनी गावात सभा घेऊन सर्वांच्या अनुमतीने निर्णय घेण्यात आले की,सदर दुकानदाराचा परवाना रद्द करून नवीन रेशन दुकानदाराची नियुक्ती करायला हवी होती.धान्याची गाडी सुद्धा येणार असल्याची माहिती गावकऱ्यांना मिळाली असता हे धान्य आम्ही स्वीकारू शकत नसल्याचे सांगत या गाडीला गावात प्रवेश देणार नाही “बहिष्कार म्हणजे बहिष्कार” हा नारा गावाकऱ्यांनी दिला.अनेक निवेदने देऊनही तहसीलदार योग्य बाजू मांडून निर्णय घेत नसल्याचे पाहून अखेर गावकऱ्यांनी एल्गार पुकारला आहे. याविषयी News34 प्रतिनिधींनी तहसीलदार कोरपना यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता तहसीलदार यांनी कॅमेरापुढे बोलण्याच नकार दिला.आता कोठोडावासीयांनी पुकारलेल्या एल्गाराची शासन काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here