चंद्रपूर – चंद्रपूर जिल्ह्यातील वाढता कोरोनाचा प्रादुर्भाव बघता 10 सप्टेंबर पासून बल्लारपूर व चंद्रपूर शहरात 4 दिवसांचे जनता कर्फ्युचं आवाहन केल्या गेलं आहे.
जिल्ह्यातील एकूण 4386 पॉझिटिव्ह बाधित बघता चंद्रपूर शहरात तब्बल 1803 बाधित आहे, सोशल डिस्टनसिंग व मास्क न लावणाऱ्या नागरिकांवर पालिका दंडात्मक कारवाई करीत आहे परंतु महानगरपालिकाचे उपमहापौर व स्थायी समिती अध्यक्ष राहुल पावडे यांनी त्या सर्व नियमांना पायदळी तुडविण्याचे काम केले.
8 सप्टेंबरला पावडे यांच्या वाढदिवसानिमित्त सोशल डिस्टनसिंग चे सर्व नियम धाब्यावर बसवीत मास्क विना उत्साहात हा वाढदिवस पावडे यांच्या घरी साजरा करण्यात आला.
याआधी सुद्धा भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी नियम तोडण्याची जणू साखळीच सुरू केली आता यामध्ये राहुल पावडे यांची सुद्धा भर पडली आहे.
एकीकडे शहरातील नागरिकांना नियमांचे धडे द्यायचे व दुसरीकडे ते धडेच पुस्तकातून फाडून टाकायचे असा प्रकार राहुल पावडे यांनी केला.
आम्ही नियम तोडण्यात किती पुढे आहो हे दाखविण्यासाठी सर्व फोटोच सोशल मीडियावर शेअर करण्यात आले आहे.
या सर्व प्रकाराने पुन्हा एकदा सिद्ध झाले की नियम हे फक्त सामान्य जनतेसाठीचं आहे राजकीय लोकांना हे नियम लागू होत नाही, जिल्ह्यात 144, आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू असताना सुद्धा उपमहापौर कोरोना काळात सुद्धा काळजी न घेता उघडपणे नियम मोडत आहे.