दारू तस्करीत महिलांचा वाढता सहभाग

0
95
Advertisements

चिमुर – चिमुर पोलिसांची पोस्टेच्या हद्दीत अवैध दारू पुरवठादार व विक्रेत्यां विरोधात जबरदस्त कामगीरी पो.नि. स्वप्निल धुळे यांचे मार्गदर्शनात मागील वर्ष भरापासुन सुरू असुन, त्याचाच एक परिचय म्हणून वारंवार अपराध करणारी महिला नसीम फिरोज शेख रा. चावडी चौक चिमुर हि आपल्या साथीदारासह मौजा मासळ टि पाँईट जवळ दारु घेऊन येत आहे. अशी माहिती मिळाल्याने पांढर्या रंगाची स्कार्पिओ MH03 AR 9192 या चारचाकी वाहनास थांबवुन वाहनांची पाहणी केली असता एकुण देशी दारु किमंत 2,68,000 रु तसेच एक चारचाकी वाहन स्कार्पिओ किमंत 5,00,000 रु व दोन मोटर सायकल किंमत प्रत्येकी 60,000 रु प्रमाणे 1,20,000 असा एकुण 8,88,000 रु चा मुद्दे माल मिळुन आल्याने मुद्देमाल जप्त करुन पाच आरोपी विरुध्द गुन्हा नोंद करुन चार आरोपीस अटक करण्यात आली. सदरची कार्यवाही उप विभागीय पोलीस अधिकारी वरोरा अतिरिक्त कार्यभार चिमुर श्री. निलेश पांडे यांचे मार्गदर्शनात पो हवा. विलास निमगडे पोशि सचिन गजभिये, पोशि विनायक सरकुंडे यांचे पथकाने पार पाडली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here