10 सप्टेंबर पासून ऑनलाईन उद्योजकता विकास प्रशिक्षण

0
72
Advertisements

चंद्रपूर : महाराष्ट्र  उद्योजकता  विकास केंद्र, चंद्रपूरद्वारे  10 वी  पास  व 18 वर्षे पूर्ण असलेल्या युवक-युवतींकरीता 10 ते 22 सप्टेंबर या कालवधीमध्ये ऑनलाइन उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे.

             सदर कार्यशाळेत ऑनलाईन बिझनेस संधी, आयाडिया, उद्योजकता व उद्योजकाचे गुण, लघु उद्योग उभारणी, विविध उद्योग संधी मार्गदर्शन, सेवा उद्योग व लेदर इंडस्ट्रीज, शेतीवर आधारीत उद्योग, पशुसंवर्धन इत्यादी उद्योगातील संधी, उद्योजकीय प्रेरणा प्रशिक्षण, संभाषण कौशल्य, संकलन व आकलन कौशल्य, सर्जनशीलता, नाविन्यपूर्तता व समस्या निराकरण, संघटनाचे प्रकार, शासकीय कार्यालयातील विविध योजना, बाजारपेठ पाहणी, साधने व तंत्रज्ञान, उत्पादन निवड, उद्योगासाठी लागणारे परवाने नाहकरत प्रमाणपत्र व नोंदणी, जीएसटी नोंदणी, उद्योगाचे व्यवस्थापन, विपणन व्यवस्थापन, उत्पादन व कच्चा माल यांचे व्यवस्थापन, उत्पादन नियंत्रण व नियोजन, आर्थिक व्यवस्थापन, प्रकल्प अहवाल, डिजीटल मार्केटिंग, ऑनलाईन कर्ज प्रक्रीया व कृती आराखडा तयार करुन अंमलबजावणी करणे इत्यादी विषयावर ऑनलाईनद्वारे मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

Advertisements

सदर प्रशिक्षणात ऑनलाइन प्रवेश घेण्याकरीता इच्छुक युवक- युवतींनी त्वरीत दिनांक 9 सप्टेंबर पर्यंत महाराष्ट्र उद्योजकता विकास केन्द्र, उद्योग भवन, दुसरा माळा, गाळा क्र. 208, बस स्टॉप समोर, रेल्वे स्टेशन रोड, चंद्रपुर येथे संपर्क साधावा. तसेच अधिक माहितीसाठी प्रकल्प अधिकारी के.व्ही.राठोड (मो.नं.9403078773, 07172-274416) व कार्यक्रम आयोजक मिलिंद कुंभारे (मो.नं.9011667717) यांच्याशी संपर्क साधावा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here