गणेश लोंढे / नांदा फाटा
नांदाफाटा गडचांदूर परिसर अवैध दारू विक्रीसाठी कुप्रसिद्ध आहे खाकीचा धाकच गेल्याने गडचांदूर पोलीस उपविभागात सट्टापट्टी व्यवसायाला सुगीचे दिवस आले आहे भरचौकात बाकायदा काउंटर लावून उघडपणे सट्टापट्टीचा घेत आहे खुलेआम अवैध धंद्या करिता एक वरिष्ठ अधिकारी बाकायदा मोठी रक्कम घेऊन प्रोत्साहन देत असल्याची परीसरात चांगलीच चर्चा आहे
अवैध दारू विक्रीसाठी प्रसिद्ध असलेल्या गडचांदूर नांदाफाटा परिसरात मोठ्या प्रमाणात सट्टापट्टीचा व्यवसाय उघडपणे सुरु असल्याचे चित्र आहे धनवान होण्याच्या आशेवर सकाळ पासुनच बाजारपेठेत चौकाचौकांत जुगार शौकिनांची येणारा आकडा कुठला याचा अभ्यास करतानांची वर्दळ पाहावयास मिळते नगरपरिषद व ग्रामपंचायतीचे पदाधिकारीही सट्टापट्टी घेणाऱ्यांच्या मुसक्या आवरुन लुट थांबवू शकते विरोध करायची ताकद व इच्छाशक्तीचा अभाव असल्याने मूकदर्शक बनले आहे दुसरीकडे ज्यांच्यावर अवैध धंदे चालू न देण्याची जबाबदारी आहे त्यांचे वरिष्ठांचा आर्शिवाद असल्याने कनिष्ठांची मात्र चांदी आहे नांदाफाटा येथील अण्णा नामक व्यक्तीवर ६/७ वेळा कारवाई होऊनही मागील ४ वर्षापासुन राजरोसपणे सट्टापट्टी घेतली जाते आता थेट वरिष्ठांचा आशीर्वाद जादा असल्याने बाकायदा हस्तक ठेवून टेबल लावून उजेळात सट्टापट्टी घेत असल्याने गडचांदूर पोलिसांच्या कार्यप्रणालीवर प्रश्न निर्माण झाले आहे स्थानिक पोलीस कारवाई करीत नसल्याने आता जिल्हा पोलिस अधीक्षक आशीर्वाद देणाऱ्यांवरच कारवाई करतील का असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.