चंद्रपूर एसटीच्या विभागीय कार्यशाळेत कोरोनाचा शिरकाव

0
122
Advertisements

चंद्रपूर – जिल्ह्यात सतत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे, शासकीय कार्यालय सुद्धा कोरोनाच्या विळख्यात आलेले आहे, काळजी म्हणून सर्व शासकीय कार्यालये सॅनिटायझ करण्याचं काम सुद्धा सुरू आहे.
चंद्रपूर एसटी विभागीय कार्यशाळा तुकूम येथे आज 3 कोरोना बाधित मिळाल्याने कर्मचाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली असून कोरोनामुळे कर्मचारी घाबरलेले आहे.
तुकूम येथील विभागीय कार्यशाळेत एकूण 150 कर्मचारी कार्यरत आहे, काही दिवसांपूर्वी 1 कर्मचारी व आज 3 असे 4 कर्मचारी कोरोनाबाधित मिळाले.
विभागीय नियंत्रक पाटील यांनी news34 शी बोलताना सांगितले की सध्या जे कर्मचारी बाधितांच्या संपर्कात आले त्यांची तपासणी करण्यात येत आहे.
कर्मचाऱ्यांनी घाबरण्याचं काम नाही, गरज वाटल्यास कार्यालय काही दिवस बंद ठेवता येणार परंतु आपण सध्या खबरदारी घेत काम सुरू ठेवणार आहे अशी प्रतिक्रिया पाटील यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here