Advertisements
चंद्रपूर – जटपुरा वार्ड येथील प्रसिद्ध जनार्धन मेडिकलने मनपाच्या जागेवरील अवैधरित्या अतिक्रमण केले आहे, परंतु मनपा प्रशासन कारवाई न करता स्वतःची हतबलता दाखवीत आहे.
जनार्धन मेडिकल हे महापौर यांच्या नातेवाईकांचे असल्याने मनपा कारवाई करण्यास टाळाटाळ करीत आहे, अवैध अतिक्रमण तात्काळ काढण्यात यावे अन्यथा मनपा कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करू असा इशारा संजीवनी पर्यावरण समितीचे अध्यक्ष राजेश बेले यांनी दिला आहे.
या अवैध अतिक्रमनाची तक्रार बेले यांनी मनपा आयुक्त यांचेकडे केली आहे.