माजरी येथे अल्पवयीन मुलीवर अत्याचार?

0
268
Advertisements

माजरी – लॉकडाऊनच्या काळात वरोरा तहसील येथील रामपूर ला 16 वर्षीय अल्पवयीन मुलगी आपल्या नातेवाईकांकडे रहायला आली होती, अल्पवयीन मुलगी ही 8 महिन्याची गर्भवती असल्याची माहिती मिळाल्याने नातेवाईक व मुलीच्या परिवारात एकच खळबळ उडाली.
मुलीच्या नातेवाईकांनी या प्रकरणाची तक्रार माजरी पोलीस स्टेशन मध्ये केली.
पोलिसांनी पीडित मुलीला याबद्दल विचारणा केली असता, मला काही आठवत नाही असे उत्तर दिले.
पोलिसांनी संशय आला की मुलीवर कुणी अज्ञात व्यक्तीने अत्याचार केला असावा किंवा त्या मुलीचे शोषण झाले असावे, भीतीपोटी ही मुलगी काही सांगत नाही यावरून पोलिसांनी पोस्को व 376 कलमांव्ये गुन्हा दाखल केला.
या प्रकरणाचा तपास सहायक पोलिस निरीक्षक विद्या जाधव करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here