पैश्याचे आमिष देत अल्पवयीनला केली शरीरसुखाची मागणी

0
252
Advertisements

गोंडपीपरी – शासनाच्या विभिन्न योजनेअंतर्गत मध्यमवर्गीयांसाठी विविध प्रशिक्षण दिल्या जाते, यामध्ये शिवणक्लास, संगणक प्रशिक्षणचा समावेश असतो.
असेच एक मिनी आयटीआय आहे, या आयटीआयचा संचालक अमित अलोने नामक युवक आहे.
या आयटीआय मध्ये करंजी या ग्रामीण भागातील अल्पवयीन मुली शिवणकलाचे प्रशिक्षण घेत होते, शिवनक्लास चे प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर या मुली आयटीआय मध्ये डिप्लोमा आणायला गेले असता संचालक अमित अलोने यांनी एका मुलीला पैश्याचे आमिष देत शरीरसुखाची मागणी केली, यासाठी मी तुला दहा हजार रुपये देतो, खोट वाटत असेल तर आता हजार रुपये घे, म्हणत त्या मुलीसोबत अश्लील शब्दात बोलायला लागला.
अचानक झालेला हा प्रकार बघून पीडित मुलगी घाबरली.
आपल्या गावी आल्यावर झालेला प्रकार त्या मुलीने आपल्या आई वडिलांसमोर कथन केला.
मुलीच्या वडिलांनी हा संपूर्ण प्रकार ऐकल्यावर तात्काळ गोंडपीपरी ठाणे गाठून अमित अलोने विरोधात तक्रार केली.
मुलगी अल्पवयीन असल्याने पोलिसांनी पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करून अलोनेला अटक केली.
प्रकरणाचा पुढील तपास ठाणेदार संदीप धोबे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक धर्मराज पटले करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here