पालकमंत्री आहे की मजाकमंत्री – पारोमिता गोस्वामी

0
340
Advertisements

चंद्रपूर – विदर्भातील भंडारा, गोंदिया, नागपूर, गडचिरोली व चंद्रपुरातील मानवनिर्मित पुराने कोट्यवधी रुपयांची हानी झाली आहे परंतु मदतीच्या नावाखाली महाविकास आघाडी पुरग्रस्तांची दिशाभूल करीत आहे.

पश्चिम महाराष्ट्रात आलेल्या नैसर्गिक वादळात जे निकष लागू केले त्याप्रमाणे विदर्भातील जनतेला मदत करा अशी मागणी आम आदमी पार्टीच्या महाराष्ट्र सदस्य पारोमिता गोस्वामी यांनी केली आहे.

मध्यप्रदेश सरकारतर्फे कोणतीही पूर्वसूचना न देता हजारो क्यूसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आले ज्यामुळे गोसिखुर्द धरणाचे दरवाजे उघडण्यात आले म्हणजेच दोन्ही राज्यात काही समनव्य नाही.

चंद्रपुरातील पूरग्रस्त भाग सतत 3 दिवस अंधारात होते, पालकमंत्री वडेट्टीवार यांनी तातडीची 25 हजारांची मदत जाहीर केली परंतु नागरिकांना 1 रुपयांची सुद्धा मदत मिळाली नाही हे पालकमंत्री आहे की मजाकमंत्री असा संतप्त सवाल पारोमिता गोस्वामी यांनी यावेळी उपस्थित केला.

निसर्ग चक्री वादळातील नुकसानग्रस्त भागाला तात्काळ 400 कोटींची मदत याच पुनर्वसन विभागाने दिले होते मग विदर्भावर अशी तुटपुंजी मदत का?

पूर पंचनामा सुद्धा अक्षरक्षा चुकीच्या पद्धतीने होत आहे, पूरग्रस्त भागात शासनातर्फे साधे आरोग्य शिबीर किंवा चारा छावणी लावण्यात आले नाही.

रायगड मध्ये नैसर्गिक चक्रीवादळ आले असताना सरकारचे संपूर्ण मंत्रिमंडळ उपस्थित होते, परंतु विदर्भातील मानवनिर्मित पूरग्रस्त भागात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, महसूलमंत्री, शासनाचे सचिव फिरकले सुद्धा नाही, हा तर विदर्भावर अन्याय आहे.

पालकमंत्री विजय वडेट्टीवार हे विदर्भाचे मंत्री असून सुद्धा विदर्भातील पूरग्रस्त भागाला न्याय देऊ शकले नाही, जे निकष नैसर्गिक चक्री वादळासाठी लागू केले होते तेच निकष विदर्भातील पूरग्रस्त भागासाठी लागू व्हायला पाहिजे.

अशी मागणी आयोजित पत्रपरिषदेत आम आदमी पार्टीच्या वतीने करण्यात आली, यावेळी जिल्हाध्यक्ष सुनील मुसळे, विजय सिद्धावार आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here