ब्रम्हपुरी : तालुक्यातील पूरग्रस्त भागाचा दौरा करीत असताना जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या गुरणुले यांनी येथील शासकीय विश्रामगृहात अधिकारी व जी. प.सदस्यांची आढावा बैठक घेतली. मात्र, स्थानिक तीन सदस्यांना बोलवण्यात आले नाही. सर्वाधिक पूरग्रस्त भाग याच तीन सदस्यांच्या क्षेत्रात सर्वाधिक येतो. त्याच सदस्यांना डावलण्यात आल्याचा आरोप जी. प. सदस्य प्रमोद चिमूरकर यांनी प्रसिद्धी पत्रकातून केला आहे.
प्रमोद चीमुरकर यांच्या गांगलवाडी – मेंडकी जी. प. क्षेत्रातील खरकाडा, ( पिपळगव), रुई , नीलज, पाचगाव, मांगली, गवरला, बेलपातळी, मुई, गांगलवाडी, या क्षेत्राचा समावेश पूरग्रस्त भाग म्हणून झाला आहे. स्मिता पारधी यांच्या मालडॉगरी – पिंपळगाव या क्षेत्रातील पिंपळगाव ( भोसले) चिखलगाव, चिंचोली, लाडज, हरदोली, कोथूळणा, नवेगाव, सोंद्री, सुराबोडी, सोनेगाव, सांवलगव, झिलाबोडी, परसोडी, बोरगाव, पारडगव, बेटाळा, बोढेगाव, किन्ही, रणमोचन, आदी पूरग्रस्त गावांचा समावेश आहे. तर राजेश कांबळे यांच्या आवळगव – मुडझा क्षेत्रात बरडकिन्ही, चीचगाव, डोर्ली, आवळगाव, हळदा बोडधा या गावांचा समावेश पूरग्रस्त भागात होतो.या गावांची स्थिती अतिशय दयनीय झाली आहे. त्यात अनेकांची घरे पडली, गुरेढोरे वाहून गेली, धान, कापूस, तूर इत्यादी पिकांची नासधूस झाली. गावातील विहीर व हातपंपाचे पाणी गढूळ झाले, मोटारपंप बंद पडले.
तिन्ही जिल्हा परिषद क्षेत्रात अत्यंत गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा संध्या गुरानुले यांनी पूरग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी आल्या असता येथील शासकीय विश्रामगृहात आढावा बैठक घेतली. अधिकारी व भाजपच्या सदस्यांना बैठकीला बोलविले. मात्र, शासकीय बैठक असतानासुद्धा काँग्रेसच्या तीन सदस्यांना डावलण्यात आले असल्याचा आरोप जी. प. सदस्य प्रमोद चीमुरकार यांनी प्रसिध्दी पत्रकद्वारे केला आहे.
जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा गुरानुले यांनी पूरग्रस्त भागातील गुरांकरिता ४० हजार टन चारा जिल्हा परिषदेकडून देण्यात येणार असल्याचे जाहीर केले. मात्र तीन चार दिवसांचा कालावधी लोटूनही ही मदत देण्यात आली नाही. त्यामुळे त्यांनी केवळ आश्वासनाची गाजर दिले असल्याचा आरोपही चीमुरकर यांनी केला आहे.
हे वागणं बर नव्हं, पूरग्रस्त आढावा बैठकीला स्थानिक जि. प.सदस्यांना डावलले
Advertisements