Advertisements
कोरोना बातमीपत्र
चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कोरोना पॉझिटिव्हची संख्या 3903 झाली आहे. यापैकी 1850 बाधित बरे झाले आहेत तर 2007 जण उपचार घेत आहेत.
रविवारी एकूण 262 बाधित पुढे आले आहेत. मागील 24 तासात 5 बाधितांचा मृत्यू झाला आहे.
ज्यामध्ये चिमूर तालुक्यातील शिवरा येथील 40 वर्षीय पुरुष, विकास नगर वरोरा येथील 70 वर्षीय पुरुष, चंद्रपूर तुकूम मधील 65 वर्षीय पुरुष, मूल तालुक्यातील केळझर येथील 86 वर्षीय पुरुष व पाचवा मृत्यू शहरातील दादमहल परिसरातील 90 वर्षीय बाधितांचा मृत्यू झाला. सर्व मृतक बाधितांना कोरोनासह न्यूमोनियाचा आजार होता अशी माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.
चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आतापर्यंत कोरोनामुळे 42 रुग्णाचा मृत्यू झाला आहे.