Advertisements
चंद्रपूर – चंद्रपूर जिल्ह्यात वेगात वाढणाऱ्या कोरोनाने नागरिक भीतीच्या वातावरणाखाली जगत आहे, आरोग्य प्रशासन सुद्धा यावर नियंत्रण करण्यात अपयशी ठरत आहे.
आज जिल्ह्यात लॉकडाऊन करण्याची नितांत गरज आहे परंतु केंद्र शासनाच्या परवानगीशिवाय लॉकडाऊन करता येत नाही म्हणून आता जनता कर्फ्यु लोकप्रतिनिधी व प्रशासनाची बैठक घेत लागू करण्यात येणार आहे.
शासकीय कार्यालय, आमदार, जनप्रतिनिधी सुद्धा आज कोरोनाच्या विळख्यात सापडले आहे, खुद्द पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी सुद्धा कोरोना चाचणी केली असता त्यांचा अहवाल निगेटिव्ह आला, खबरदारी म्हणून त्यांनी ही चाचणी केली आहे.