बालरोगतज्ज्ञ डॉ अभिलाषा बेहेरे गावतुरे यांनी चिमुकलीला दिलं जीवनदान

0
82
Advertisements

चंद्रपूर –  कोरोनाच्या काळात जिथे श्वसनाचा त्रास असलेल्या रूग्णांना कुणी डाक्टर भरती करुन घ्यायला तयार होत नाही अशा परिस्थितीत ती ८ वर्षाची चिमुकली जेव्हा डॉ अभिलाषा गावतुरे यांच्या कडे आली तेव्हा त्यांच्या लक्षात आले की सिकल थलेसिमिया ने वयाच्या सहाव्या वर्षापासून त्रस्त आहे व  तिला दर महिन्याला ब्लड ट्रांसफ्युजन ( रक्त संक्रमण) ची गरज आहे. नेहमीप्रमाणे जेव्हा एका प्रायवेट दवाखान्यात रक्त दिले गेले पण त्यानंतर जी रिएक्शन झाली, त्यामुळे तिचे दोन्ही फुफ्फुसे, किडनी, लिव्हर व ह्दय असे चारही अवयव निकामी झाले . फुफ्साच्या  दोन्ही बाजूला व पोटात पाणी जमा झाले होते, लिव्हर ला सुज आली होती, किडनी निकामी झाली व तिचा रक्तदाब खूप वाढला होता आणि अशा परिस्थितीत त्यांना  डायलिसिस व पुढील उपचारासाठी नागपूर ला जायला सांगितले तेव्हा त्यांनी डॉ अभिलाषा गावतुरे यांच्या कडे धाव घेतली.

तिच्या आजाराचे व्यवस्थितपणे निदान करून त्यांनी लगेच औषधोपचार सुरू केले.अवघ्या चार पाच दिवसात प्रकृतीत सुधारणा व्हायला लागली व सर्व अवयव व्यवस्थित काम करायला लागले . नंतर आयसीयु च्या बाहेर काढून तिला जनरल वार्डात पाच दिवस आणखी ठेवून पुर्णपणे बरी झाल्यावर तिला घरी पाठविले. डॉ गावतुरे व संपूर्ण चमू ला अतिशय आंनद झाला.

Advertisements

काय आहे ट्राली विथ टाको ?

सामान्यतः सिकल थलेसिमिया आजारांमध्ये  वारंवार रक्त देण्याची आवश्यकता असते.पण वारंवार रक्त दिल्याने शरीरात प्रतिजैविके तयार होतात आणि 100पेशंट पैकी १ ला ट्रासफयुजन रिलेटेड एक्युट लंग इन्जुयरी ( TRALI)  व ट्रांसफ्युजन असोसिएटेड कार्डिएक ओव्हर लोड ( TACO)  होण्याची शक्यता असते व पेंशटला अशा अवस्थेत फुफसांना इजा होउन दम लागतो,आक्सिजन ची गरज पडते, हदयाला त्रास होऊन रक्तदाब वाढतो, ह्रदयाची आकुंचन क्षमता कमी होते, तसेच किडनी वर असर होऊन किडनी तात्पुरती काम करणे बंद करतात.जर वेळीच निदान व उपचार न झाल्यास रूग्णांवर गंभीर परिणाम होऊ शकतात . पुढील वेळी रक्त देताना विशेष काळजी घेण्याची गरज पडते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here