चंद्रपूर : मागील पाच महिन्यापासून कोरोना विषाणूने मोठ्या प्रमाणात जनजीवन विष्काळीत केले आहे. या काळात लॉकडाऊन असल्यामुळे कोणत्याच प्रकारचे शैक्षणिक काम झाले नाही. परंतु आता मात्र विविध शाखांमध्ये प्रवेश घेण्याकरिता उपविभागीय कार्यलयामार्फत जातीचा दाखला, सेंट्रल कॉस्ट , नॉन क्रिमिलेयर सर्टिफिकेट इत्यादी कागदपत्र मिळतात. आता महाविद्यालयात प्रवेश सुरु असताना तीन दिवस लोटून देखील उपविभागीय अधिकारी रोहित घुगे यांची डिजिटल सही रजिस्टर नसल्यामुळे विद्यार्थ्यांना कागदपत्रे मिळत नसल्याची गंभीर बाब समोर आली आहे. या गंभीर बाबीची दखल घेत NSUI तर्फे याची तक्रार जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांच्याकडे केली आहे.
सध्या महाविद्यालयात प्रवेश त्या सोबतच CAT व इतर परीक्षा तोंडावर आहे. त्यामध्ये अर्ज भरताना उपविभागीय कार्यलयामार्फत जातीचा दाखला, सेंट्रल कॉस्ट , नॉन क्रिमिलेयर सर्टिफिकेट इत्यादी कागदपत्र आवश्यक आहे. मोठ्या प्रमाणात विध्यार्थ्यानी देखील हे कागदपत्र मिळविण्याकरिता उपविभागीय अधिकारी चंद्रपूर यांच्याकडे अर्ज सादर केले होते. विद्यार्थ्यांना दिलेल्या कालावधीत हे सर्व कागदपत्र उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयातून मिळणार अशी आशा होती. परंतु उपविभागीय अधिकारी रोहित घुगे यांची डिजिटल सही रजिस्टर नसल्यामुळे विद्यार्थ्यांची तारांबळ उडाली आहे. कोरोना असताना देखील कागदपत्र मिळविण्याकरतीत उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर मोठी गर्दी बघावयास मिळाली आहे.
या सर्व प्रकारची गंभीर दखल घेत एन. एस. यू. आय. जिल्हाध्यक्ष यश दत्तात्रय यांची जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे. हि गंभीर बाब असून यावर त्वरित कारवाही करून विध्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्याची मागणी एन. एस. यू. आय. जिल्हाध्यक्ष यश दत्तात्रय यांनी केली आहे.