आबीद अली यांच्या राकाँ प्रवेशाने कार्यकर्ते उत्साहित

0
98
Advertisements

गडचांदूर/सैय्यद मूम्ताज़ अली:-
जिल्ह्याच्या राजकारणात अल्पसंख्याक समुदायातून आलेला एक मोठा चेहरा म्हणून ओळख असलेले,सर्व समाज बांधवांच्या न्याय हक्कासाठी झटणारे नेते जनसत्याग्रह संघटना अध्यक्ष सैय्यद आबीद अली यांनी नुकताच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला आहे.याबातमीने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारल्याचे पहायला मिळत आहे.
सैय्यद आबीद अली हे गेले कित्येक वर्ष काँग्रेस मध्ये होते.याठिकाणी अनेक पद भूषवित उल्लेखनीय कार्य केले.मात्र पक्षातील गटबाजीच्या राजकारणाला कंटाळून अखेर त्यांनी काँग्रेस पक्षाला रामराम ठोकून 19 फेब्रुवारी 2016 मध्ये चंद्रपूर जिल्ह्याचे तत्कालीन पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार,राजूरा विधानसभेचे माजी आमदार अँड.संजय धोटे यांच्या नेतृत्वात भाजपमध्ये प्रवेश केला.मात्र भाजपमध्ये गेल्यावर जुन्या नव्याचा वाद व गटबाजी दिसून येत होती.आश्चर्यची बाब म्हणजे सहा महिने लोटूनही अली यांना पक्षाची सदस्यता न देता भाजपाच्या राज्यस्तरीय नेत्यांनी यांना चक्क पक्षातूनच निलंबित केले.यानंतर यातील एका गटाने अली यांना सतत पक्षाच्या प्रत्येक कार्यक्रम व पक्षाच्या ध्ययधोरणपासून दूर ठेवण्याचा आटापिटा सुरू केला.निलंबन मागे घ्या असे पत्र अली यांनी 5 अॉगस्ट रोजी भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील व जिल्ह्यातील नेत्यांना दिले होते.मात्र यांनी गंभीरतेने घेतले नाही.
दरम्यान राकाँचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य यांनी पक्षश्रेष्ठी ना.अनील देशमुख गुहमंत्री व खासदार प्रफुल पटेल यांच्याशी संपर्क करून चर्चा घडवून आणली.जिल्ह्यातील राकाँचे नेते मोरेश्वर टेंभुर्डे,राजूरा राकाँ विधानसभा प्रमुख माजी जिल्हापरिषद सभापती अरूण निमजे,राकाँ महिला जिल्हाध्यक्षा बेबी उईके,दीपक जयस्वाल,गडचांदूर न.प. उपाध्यक्ष शरद जोगी,मुनाज भाई यांच्या उपस्थितीत नागपूर येथे गृहमंत्री अनील देशमुख यांच्या निवासस्थानी सैय्यद आबीद अली सह अनु जाती आघाडीचे विनोद जुमडे,आदिवासी युवा नेते सुदर्शन आडे इत्यादींनी 4 अॉगस्ट रोजी राकाँ मध्ये प्रवेश घेतला.गृहमंत्री देशमुख यांनी सर्वांना पुष्पगुच्छ व पक्षाचा दुपट्टा टाकुन स्वागत केले.काही दिवसात मोठ्याप्रमाणात कार्यकर्ते सुद्धा राकाँमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती आबीद अली यांनी दूरध्वनीवरून News34 ला दिली आहे. अली यांच्या राकाँ प्रवेशामुळे अनेक पक्षात खळबळ माजली असून तालुक्यात मोठा राजकीय भुकंप आल्याचे चित्र आहे. लवकरच याभागात संपर्क मंत्र्याचा दौरा आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती असून पक्ष संघटन व कार्यकत्यांना पक्षाचे ध्येय,धोरण सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न तसेच सर्व कार्यकर्त्यांना सोबत घेऊन वाटचाल करू असे जिल्हाध्यक्ष राजेन्द्र वैध यांनी म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here