समाजभवन प्रबोधनाचे केंद्र व्हावे : आमदार प्रतिभाताई धानोरकर

0
134
Advertisements

वरोरा : अनेक गावांमध्ये समाज भवनाच्या इमारती उभ्या आहेत. परंतु त्या इमारतीमध्ये कुठल्याच प्रकारचे कार्य होत नसून त्या अशाच असाळ पडल्या असल्याचे चित्र पाहावयास मिळते. परंतु समाज भवन आता फक्त इमारतच न राहता समाजप्रबोधनाचे केंद्र बनावे असे आवाहन आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी केले आहे.

त्या लेखाशिर्षक २५-१५ ग्रामविकास कार्यक्रम सन २०१८-२०१९ अंतर्गत मौजा साखरा राजा ता.वरोरा येथील आमदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या हस्ते समाजभवनाचे लोकार्पण कार्यक्रमाप्रसंगी बोलत होत्या.

Advertisements

याप्रसंगी कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचे वरोरा विधानसभा अध्यक्ष विलास नेरकर, सभापती कृ.उ.बा.स.,वरोरा राजेंद्र चिकटे, वरोरा तालुका अध्यक्ष काँग्रेस कमिटी मिलिंद भोयर, सभापती, पं.स.वरोरा रवींद्र धोपटे, ,  बंडुजी डाखरे, वरघणे, सरपंच साखरा राजा दिनेश लोहारे, दिवाकर निखाडे, सुधाकर जुनघरे, विक्रमजी भोयर, शंकर भोंगळे, अंबादास मोहारे तसेच गावकरी मंडळी उपस्थित होती.

पुढे बोलताना त्या म्हणाल्या कि, गावामध्ये राजकारण जास्त असते. त्यामुळे गावाच्या विकासाला ब्रेक लागत असतो. त्यामुळे गावातील राजकारण दूर सारून विकासाचे राजकारण केल्यास निश्चित मोठ्या प्रमाणात गावाच्या विकास करण्यास मदत होईल. असे आवाहन आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी केले. यावेळी अन्य मान्यवरांनी आपली मते व्यक्त केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here