भाऊ…! गडचांदूर न.प.चा कारभारच वेगळा

0
65
Advertisements

गडचांदूर/सैय्यद मूम्ताज़ अली:-
गडचांदूर आठवडी बाजारातील सार्वजनिक शौचालयाचा घाण मटेरिअल व सांडपाणी गेल्या 4,5 महिन्यांपासून टँक मध्ये न जाता चक्क बाहेर निघून रस्त्यावर वाहत असल्याने सदर परिसरात घाण व दुर्गंधी पसरली आहे.मुख्य म्हणजे या शौचालयाच्या बाजूला शुद्ध पाण्याचे ATM मशीन बसविण्यात आले आहे.याठिकाणी येणारे व परिसरातील नागरिकांंचे आरोग्य येथील घाणीमुळे अक्षरशः धोक्यात आले असताना न.प.च्या संबंधीत विभाग अधिकारी,कर्मचारी यांना गेल्या एक महिन्यापासून प्रत्यक्ष व दूरध्वनीवरून सदर समस्या सांगण्यात येत आहे.मात्र आता एक महिन्यानंतर यांना जाग आली आणि कामगारांनी सध्या शौचालयाच्या बाहेर येणारे सांडपाणी व घाण संदर्भात प्रतिबंधात्मक उपाययोजना करायला सुरुवात केल्याचे निदर्शनास येत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर स्वच्छते विषयी स्थानिक नगरपरिषद किती गंभीर आहे हे यावरून कळते.म्हणूनच तर नागरीक म्हणतात “भाऊ…!गडचांदूर नगरपरिषदेचा कारभारच वेगळा” आता ही समस्या कायमस्वरूपी निकाली काढण्यात आली की तात्पुरती हे येणारा काळच ठरवेल अशी चर्चा ठिकठिकाणी ऐकायला मिळत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here