आमदार सुभाष धोटे यांनी केली पूरबाधित पिकांची पाहणी

0
122
Advertisements

गोंडपिपरी:–गोसीखुर्द प्रकल्पाचे सर्व दरवाजे पाच मीटरपर्यंत उघडण्यात आले त्यामुळे तालुक्यातील जवळपास 18 हून अधिक गावातील शेती पाण्याखाली आल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. शेतकऱ्यांनी कर्ज काढून उसनेपासने करून घेतलेली धान,कापूस,सोयाबीन,तूळ अशी पिके महापुरात जमीनदोस्त झाली. त्यामुळे बळीराजा संकटात सापडला आहे. आमदार सुभाष धोटे यांनी पिकांची पाहणी केली असून तत्काळ पंचनामा करत शेतकऱ्यांना दिलासा देणारी भरपाई मिळेल असे आश्वासन आमदारांनी यावेळी पत्रपरिषदेत दिले.
संपूर्ण देशात कोरानो संसर्गजन्य विषाणूचे थैमान असून यातून कसेबसे बाहेर निघण्याचा प्रयत्न करणारा शेतकरी महापुरामुळे जीवन-मरणाच्या स्थितीत पोहोचला आहे. गोसीखुर्द धरणाचा दरवाजा उघडला त्यामुळे वर्धा, वैनगंगा,अंधेरी नद्या दुथडी भरून वाहू लागल्या लगतचे नाले,कालवे,तलाव फुटल्याने पाच ते सहा दिवस पीक पाण्याखाली आले उभे पीक चिखलाने माखलेले असून ते जनावरे खात नाही अशी स्थिती आहे.
गोंडपिपरी तालुक्यातील 2343 हेक्टर शेती पाण्याखाली आली असून 1510 शेतकरी बाधित झाले आहेत. शेतामधील विजेचे पंप, पाईप, मोटार पंप वाहून गेल्याने जीवन जगण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. शेतकऱ्यांच्या डोळ्यादेखत पिके वाया गेल्याचे पहायचा वेळ निसर्गाने आणला. पिके आठवडाभर पाण्याखाली राहिल्याने ती हातची गेली त्यामुळे पेरणीसाठी खत,बियाणे खरेदीसह मशागतीसाठी घेतलेल्या कर्जाची परतफेड कशी करायची या चिंतेत शेतकरी आहे.
तालुक्यात आमदारांच्या दौऱ्यामुळे शेतकरी आशावादी झाला असून आमदार धोटे यांनी नंदवर्धन, शिवणी, पानोरा, सालेझरी, राळापेठ तारसा बु, कुलथा या गावातील पाण्याखाली आलेल्या पिकांची पाहणी करून दोन दिवसात पंचनामा करून तात्काळ अहवाल सादर करण्याचे आदेश यावेळी उपस्थित असलेले उपविभागीय अधिकारी, कृषी अधिकारी, तलाठी, मंडळ अधिकारी, ग्रामसेवक यांना दिले. शेतकऱ्यांना प्रत्येकी 20 ते 25 हजाराहून अधिक हेक्टरी मदत मिळेल याकरिता प्रयत्न करण्याचे आश्वासन यावेळी आमदारांनी शेतकऱ्यांना शेतबांधावर दिले.
यावेळी आमदारसह सुरेश चौधरी सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती, तुकाराम झाडे अध्यक्ष तालुका काँग्रेस कमिटी, शंभू येलेकर, बब्लू कुळमेथे, विनोद नागापूरे, राजीवसिंह चंदेल,राजू राऊत उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here