Advertisements
कोरोना बातमीपत्र
चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कोरोना पॉझिटिव्हची संख्या 3167 झाली आहे. यापैकी 1476 बाधित बरे झाले आहेत तर 1656 जण उपचार घेत आहेत.
गुरुवारी एकूण 222 बाधित पुढे आले आहेत. मागील 24 तासात 3 बाधितांचा मृत्यू झाला आहे ज्यामध्ये आझाद चौक, तुकुम निवासी 67 वर्षीय नागरिक, भानपेठ वार्ड येथील 48 वर्षीय नागरिक व रहमतनगर परिसरातील 52 वर्षीय नागरिकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तिन्ही बाधितांना कोरोनासह न्यूमोनियाचा आजार होता अशी माहिती आरोग्यविभागाने दिली आहे.
चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आतापर्यंत कोरोनामुळे 31 रुग्णाचा मृत्यू झाला आहे.