चंद्रपूर – जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव सतत वाढत असून आज 222 बाधितांची भर झाली आहे.
एकूण बाधितांची संख्या आता 3167 झाली असून कोरोना आता तुमच्या दारात उभा होऊन ठाकला आहे.
सध्या चंद्रपूर जिल्ह्यात लॉकडाऊनची खरी गरज आहे परंतु त्यावर सुद्धा राजकीय पदाधिकारी राजकारण करीत आहे.
ज्यावेळी कोरोनाचा प्रादुर्भाव नव्हता त्यावेळी मात्र कडक लॉकडाऊन करण्यात आले मात्र आता हा नियंत्रणाबाहेर गेल्याने सर्व बाबतीत नागरिकांना सूट देण्यात आली आहे.
सध्या जिल्ह्यात दररोज 200 ते 250 बाधित आढळून येत आहे, कोरोनाने आरोग्य विभागाची जणू झोपच उडवून दिली आहे.
पॉझिटिव्ह नागरिकांना एम्बुलेन्स साठी ताटकळत राहावे लागत आहे.
नव्याने मिळणाऱ्या बाधितांची सोय कुठे करावी यावर आरोग्यविभाग प्रयत्नशील आहे.
आता कोरोनाशी लढून चालणार नाही तर यांच्यासोबतच आपल्याला जगायचे आहे, ते सुद्धा शासनाच्या नियमांचे पालन करून.
चंद्रपूरकरांनो कोरोना दारात आहे नियम पाळा
Advertisements