चंद्रपुरात AIMIM पक्षाच्या विस्ताराने कांग्रेसमध्ये भरली धडकी

0
113
Advertisements

चंद्रपूर – ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल मुस्लिमीन (AIMIM) पक्षाचे कार्यकर्ते सर्वसामान्य जनतेचे प्रश्न मार्गी लावन्यासाठी अग्रेसर दिसत आहे . मोठ्या प्रमाणात सामाजिक बाँधीलकी जपत विधायकी कार्य करत आहे. मागील काही काळात भारतीय जनता पक्षाच्या राजवटित विशेष करुण मुस्लिम समाजामधे असुरक्षेची भावना वृद्धिगत होत आहे . धर्म निरपेक्षय असलेला समाज कांग्रेस पक्षाचा बाजूने नेहमी उभा राहिलेले आहे परंतु आता परिस्तिथि बदलत असतांना दिसत आहे. जिल्हाध्यक्ष नाहीद हुसैन आणि शहर अध्यक्ष अज़हर शेख यांच्या सक्षम नेतृत्वमधे जिल्ह्यामधे मोठ्या प्रमाणात युवक वर्ग ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल मुस्लिमीन (AIMIM) पक्षात प्रवेश करत आहे मुस्लिम समाज हा अल्पसंख्यक समाज म्हणून गणला जायच आणि नेहमी धर्मनिरपेक्ष पक्षाला मतदान करायच परंतु बदलत्या परिस्तिथित परिवर्तन करत आता हा समाज विकल्प म्हणून ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल मुस्लिमीन (AIMIM) पक्षकडे बघत आहे त्या मुळे भविष्यात निश्चितच कांग्रेस पक्षाच्या परम्परागत वोट बैंक ला खिंड लागणार असे बोलले जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here