जिवती येथे स्मशानभूमीचे पूजन

0
459
Advertisements

जिवत :- अतिदुर्गम असलेल्या जिवती तालुक्यातील नव्याने स्थापन केलेल्या जिवती नगरपंचायतचे पदाधिकारी यांच्या वरिष्ठ पातळीवर सातत्याने पाठपुरावा करुन विकास कामाना गती देण्यासाठी ०१ सप्टेंबर २०२० मंगळवारला नगरपंचायत जिवती येथे लोकप्रिय व कर्तव्यदक्ष आमदार सुभाष धोटे यांच्या शुभहस्ते हिंदू स्मशानभूमी पूजन करण्यात आले. स्मशानभूमीचे बांधकामाची अंदाजीत किमंत २५,९६,०००/- रुपये इतकी आहे.
या प्रसंगी नगराध्यक्षा सौ पुष्पाताई नैताम, उपनगराध्यक्ष अशफाक रसुल शेख, तालुका काँग्रेस अध्यक्ष गणपत आडे, नगरसेवक अमर राठोड, दत्ता राठोड, सविता आडे, मुख्याधिकारी कविता गायकवाड, रोहिदास आडे, उपसरपंच वामन पवार, आशिष डसाने, मुंजाजी गायकवाड, पाढुरंग चन्ने तसेच कर्मचारी व गावकरी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here