शरदराव पवार महाविद्यालयाचे लिपिक नळे सेवानिवृत्त

0
131
Advertisements

गडचांदूर/सैय्यद मूम्ताज़ अली:-
गडचांदूर येथील “शरदराव पवार कला वाणिज्य महाविद्यालया” च्या वतीने महाविद्यालयातील वरिष्ठ लिपिक आनंद गणपत नळे यांच्या सेवानिवृत्ती निमित्त निरोप समारंभाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.अध्यक्षस्थानी संस्था अध्यक्ष डॉ.आनंदराव अडबाले,प्रमुख अतिथी प्राचार्य डॉ.संजय कुमार सिंह व आयोजक म्हणून महाविद्यालयाचे मुख्य लिपिक शशांक नामेवार उपस्थित होते.यावेळी महाविद्यालयाच्या वतीने सत्कारमूर्ती आनंद नळे व त्यांच्या पत्नी सौ.शालिनीताई नळे यांचा शाल श्रीफळ,सन्मानपत्र,भेटवस्तू तथा साडी चोळी देऊन सत्कार करण्यात आला.तसेच संस्थेच्या वतीने सुद्धा सत्कार मूर्तींचा शाल श्रीफळ व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी डॉ.आनंदराव अडबाले अध्यक्षस्थानावरून बोलताना म्हणाले की, लिपिक हा महाविद्यालयाचा आत्मा असतो आनंद नळे हे चाकोरी बद्ध काम करणारे व महाविद्यालय प्रती तसेच कामाप्रती निष्ठा ठेवणारे लिपिक होते.यावेळी प्रमुख अतिथी प्राचार्य डॉ. संजय कुमारसिंग यांनी प्रशासकीय कामकाजा विषयी आपली भूमिका व्यक्त करून आनंद नळे यांच्या कार्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली.शिक्षक प्रतिनिधी म्हणून डॉ.संजय गोरे आणि डॉ.हेमचंद्र दुधगवळी यांनी लिपिक नळे यांच्या कार्यप्रणालीवर प्रकाश टाकत म्हणाले की,नळे हे विद्यार्थ्यांसाठी झटणारे लिपिक होते त्यांच्या भावी आयुष्यसाठी मनापासून शुभेच्छा.आयोजक म्हणून आपल्या प्रास्तावनेतून मुख्य लिपिक शशांक नामेवार यांनी आयोजनाची भुमिका विशद करून प्रशासकीय कामकाजातील अडचणी मांडल्या त्याचबरोबर नळे यांच्या कार्याची प्रशंसा केली.
सत्काराला उत्तर देताना सत्कारमुर्ती आनंद नळे यांनी महाविद्यालया प्रति कृतज्ञता व्यक्त करून प्राचार्य,प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचार्‍यांची मोलाची मदत झाल्याचे सांगितले तसेच सेवानिवृत्ती नंतरही सदैव महाविद्यालयाच्या विकासासाठी माझे योगदान राहील असे अभिवचन दिले.या निरोप समारंभासाठी विशेष करून संस्थेचे सचिव नामदेवराव बोबडे,उपाध्यक्ष तुळशीराम पुणेकर,सहसचिव विनायकराव उरकुडे,संस्था सदस्य नोगराज मंगरूळकर, माधवराव मंदे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.या समारंभात प्राध्यापक वृंद व शिक्षकेतर कर्मचार्‍यांनी सहकुटुंब सहभाग नोंदवला.कार्यक्रमानंतर स्नेह भोजनाचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर निरोप समारंभाचे सत्कारमूर्ती आनंद नळे दाम्पत्याला सजवलेल्या गाडीत बसवून त्यांच्या घरापर्यंत पोहोचवण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन प्रा.मंगेश करंबे,आभार विनोद उरकुडे यांनी मानले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here