कुसुंबी माईन्स मध्ये आदिवासींची शेती बहरली

0
98
Advertisements

गडचांदूर/सैय्यद मूम्ताज़ अली:-
जिवती तालुक्यातील वादग्रस्त आदीवासी कुटुंबांच्या शेत जमीनी माणिकगड सिमेंट कंपनीने नष्ट व कब्जा करून चुनखडी उत्खनन केल्याच्या तक्रारी 14 कुंटूबांनी पोलिस तसेच महसुल प्रशासनाकडे दाखल करून न्याय मिळावा यासाठी सतत प्रयत्न केला.उघड्यावर पडलेल्या या आदिवासींनी माईन्स परिसरातील 89 हेक्टर जमीन कसत नांगरणी,वखरणी करून तिन वर्षांपासुन कापुस,तुर,ज्वारी,धान पेरणी करत माईन्स क्षेत्रात उत्पादन घेत माईन्स लगत लोकवस्ती वास्तव्य करून नियमबाह्य 14 कुंटुबांना 7/12 व मालकी हक्क माणिकगड खदान असा उल्लेख करून आदिवासींना बेदखल करण्याचा आदेश व चुकीची नोंदी घेण्यात आली.हा वाद नागपूर खंडपीठात सुरु असताना बेकायदेशीररित्या रस्ता अडविने,रस्त्या लगत वन क्षेत्रात नियमबाह्य सायलो हापरचे बांधकाम करणे,ही बाब 8 ते 10 गावातील नागरीकांना डोकेदुखी ठरली आहे.निष्पाप आदीवासींवर गुन्हे दाखल करून त्रास दिला जात आहे.यावर्षी जोमदार पिक आले,आमच्या जमिनी आम्ही कसत आहो,चौथ्या टप्यात खदानीसाठी लिगंनडोह,कुसुंबी येथील शेतकऱ्यांनी जमीन देण्यास नकार दिला असून जिल्हाधिकारी यांच्याकडे आक्षेप दाखल करून वन व्यवस्थापन समिती ग्रामसभा व ग्रामपंचायत ठराव दिशाभूल व नागरिकांचा विश्वासघात करणारा व संशयित बनावटी असल्याचा आरोप करीत तहसीलदार यांच्याकडे वाहीवाट रस्ता व शेतात उभ्या पिकांचे मौका पाहणी करून 7/12 वर पेरे पत्रकात नोंद घेण्याची मागणी जनसत्याग्रह संघटना अध्यक्ष सैय्यद आबिद अली,संभू आत्राम,अरूण उद्दे,भावराव कन्नाके,पुष्पा मंगाम,महादेव कुडमेथे यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here