चंद्रपूर – येथील बिनबा गेट परिसरात मागील अनेक वर्षापासून बिलाल कालनी म्हणजे गोरगरीब नागरिक राहत असून तिथे विद्युत लाईन ची व्यवस्था नसल्याने नागरिकांना अंधारात राहुल लागत आहे.
सदर समस्येचे निवारण होऊन या गोरगरीब नागरिकांना विद्युत लाईन व मीटर मिळण्याकरिता महावितरण कंपनीने. 19 लाखाचे अंदाज पत्रक दिलेले आहे ते डीपीडीसी योजनेतून भरून या सर्व नागरिकांना विद्युत लाईन पॉवर मीटर मिळावा याकरिता दिनांक 29 ऑगस्टला सामाजिक कार्यकर्ता हारून भाई व छोटू भाई शेख काँग्रेस कामगार जिल्हा अध्यक्ष यांच्या नेतृत्वात पालक मंत्री वडेट्टीवार साहेब यांना निवेदन देऊन चर्चा करण्यात आली यावेळी पालक मंत्री महोदयांनी डीपीडीसी निधीतून सदर काम करण्यात येईल असे आश्वासन दिले यावेळी छोटू भाई हारून भाई यांनी पालकमंत्री महोदयांच्या आभार व्यक्त केले यावेळी उपस्थित अधिवक्ता मोहम्मद रफीक़ शेख ,मोहम्मद इरफान शेख होते.