माणिकगड सिमेंट कंपनीच्या चेअरमन बंगल्यात धाडसी चोरी

0
131
Advertisements

गडचांदूर/सैय्यद मूम्ताज़ अली:-
गडचांदूर शहराच्या मध्यभागी असलेल्या माणिकगड सिमेंट कंपनीच्या चेअरमन बंगल्यात गेल्या चार दिवसांपूर्वी आलिशान सोफा सेट,आलिशान डायनिंग खुर्च्या,सेंट्रल टेबल,बॅड,सिलिंग फैन,वाॅल लाईटसह इतर आलिशान वस्तु चोरीची घटना घडली होती.यासंबंधीची तक्रार कंपनीच्या सिक्युरिटी इंचार्ज यांनी पोलिस ठाण्यात दिल्याने गुन्ह्याची गंभीरता लक्षात घेता लगेच दोन पथके तयार करण्यात आली व गोपनीय माहितीच्या आधारे तात्काळ एका आरोपीला ताब्यात घेऊन कौशल्य पुर्वक चौकशी केली असता आरोपीने गुन्ह्याची कबूली दिली.अनवर शेख शब्बीर अंसारी वय 25,किशोर प्रमोद ठाकूर वय 30 वर्ष,रायभान भारत साहू वय 30 वर्ष(सर्व रा.गडचांदूर वार्ड नं.4) यांना पोलिसांनी अटक केली असून 2 नग जुने सोफा सेट किंमत 1 लाख,11 नग जुन्या डायनिंग खुर्च्या किंमत 33 हजार,2 नग जुने सेंट्रल टेबल किंमत 10 हजार,1नग जुने सिंगल बॅड किंमत 1 हजार 5 शे,11नग जुने सिलिंग फॅन किंमत 11 हजार,2 नग जुने ट्युब लाईट किंमत 200,1 नग जुने वॉल मॉउटींग फॅन किंमत 500,बाथरूम व टॉयलेट स्टीलचे नळ 8 नग किंमत 6 हजार 8 शे,असा एकूण 1लाख 80 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करून चोरीचा माल खरेदी करणार्‍या 2 इस्मांना सुद्धा अटक करण्यात आली आहे.सदरची कारवाई पोलिस अधिक्षक डॉ.महेश्वर रेड्डी,अप्पर पोलिस अधिक्षक प्रशांत खैरे,उपविभागीय पोलिस अधिकारी विलास यामावार यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार गोपाल भारती,तपास अधिकारी पोउपनि युवराज पाटील,सफौ सुनील बोरीकर,पोहवा सुनील मेश्राम,पोशी विश्वनाथ चुदरी,पोशी इंदल राठोड,पोशी धिरज गोवर्धन यांचे पथकाने पार पाडली आहे.सदर चोरी संदर्भात विचार केला असता कंपनीत जागोजागी कडक सिक्युरिटी असते मग चोरांनी ह्या मौल्यवान वस्तू बाहेर आणल्याच कशा ! हे मात्र न उलगडणारे कोडेच बनले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here