चंद्रपूर – 2015 पासून चंद्रपूर जिल्ह्यात लागू झालेली दारुबंदी व त्यानंतर जिल्ह्यात सुरू झालेली अवैध दारूची वाहतूक ज्यामुळे जिल्ह्यात अवैध दारूचा महापुर आला.
ही दारूबंदी उठविण्यासाठी चंद्रपूरचे पालकमंत्री वडेट्टीवार यांनी पुढाकार घेत 2 सप्टेंबर ला मुंबई येथे उत्पादन शुल्कमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील दारूबंदी हटविण्याबाबत बैठकीचे आयोजन केले होते.
परंतु विदर्भात आलेल्या पुरामुळे या बैठकीला पालकमंत्री वडेट्टीवार उपस्थित राहणार नसल्याने ही बैठक होणार की नाही याबाबत शंका उपस्थित झाली आहे.
पुराची परिस्थिती व नागरिकांना सुरक्षित ठिकाणी पोहचविणे व त्यांची काळजी घेणे हे सध्या वडेट्टीवार यांच्या मदत पुनर्वसन विभागाकडे असल्याने ते 3 सप्टेंबर पर्यन्त चंद्रपूर, गडचिरोली व नागपूर येथील पूरपरिस्थितीची पाहणी करणार आहे.