पोंभूर्णा – पोंभूर्णा हे तालूक्याचे ठिकाण आहे या ठिकानी अनेक शासकिय निमशासकिय कार्यालये आहेत मात्र ईथे कार्यरत सर्व कर्मचारी मुख्यालयी राहत नाही याचा नाहक त्रास तालूक्यातील समस्त जनतेला होत आहे शासकिय नियमानुसार मुख्यालयी राहुनच सेवा द्यावी हे अनिवार्य आहे परंतू या नियमाला बघल देत अनेक अधिकारी चंद्रपूर,मुल,ब्रम्हपुरी,नागभीड या सारख्या अनेक ठिकाणावरून ये-जा करतात ज्यामुळे सर्वसामान्य मानसाला तात्काळ सेवा मिळत नाहि घरीच रहा सुरक्षीत रहा अशा सुचना शासनाकडून वारंवार दिल्या जात अाहे मात्र हे कर्मचारी वास्तव्यास राहत नसल्याने शासनाच्या या सुचनेकडे दुर्लक्ष होत आहे अशातच कोरोणाचा प्रसार पोंभूर्णा तालूक्यात झाला असून सर्व शासकिय कर्मचार्यांना मुख्यालयी राहन्याची सक्ती करा हि मागणी मनसेचे जिल्हासचिव किशोर मडगुलवार(बल्लारपूर विधानसभाक्षेत्र)यांच्या नेतृत्वात मनसेचे पोंभूर्णा तालूका अध्यक्ष आकाश तिरूपतीवार व मनविसे पोंभूर्णा तालूका अध्यक्ष आशिष नैताम यांनी निवेदनाद्वारे तहशीलदार पोंभूर्णा यांना केली आहे यावर सात दिवसाचे आत निर्णय न घेतल्यास मनसे तफै तिव्र आंदोलन करन्याचा इशाराहि यावेळेस देन्यात आला निवेदन देतांना मनसेचे पोंभूर्णा तालूका अध्यक्ष आकाश तिरूपतीवार,मनवीसे पोंभूर्णा तालूका अध्यक्ष आशिष नैताम,तालूकासचिव अमोल ढोले,मनविसे तालूका उपाध्यक्ष राजेश गेडाम,तबरेज कुरेशी आदि मनसैनिक व पदाधिकारी उपस्थीत होते..
शासकिय कर्मचाऱ्यांना मुख्यालयी राहण्याची सक्ती करा – मनसे
Advertisements