गणेश लोंढे / नांदा फाटा
अतिक्रमण करुन अनधिकृत बांधकाम धारकावर नांदा ग्रामपंचायतीचे सरपंच / उपसरपंच कारवाई करीत नसल्याने ग्रामपंचायतीच्या सदस्या प्रिया राजगडकर २८ आगस्ट आमरण उपोषणास बसल्या होत्या उशिरा का होईना चार दिवसानंतर प्रशासनाने दखल घेत गटविकास अधिकारी बाबाराव पाचपाटील यांनी कारवाई करण्याचे आदेश दिल्याने उपोषण तुर्तास मागे घेतले असुन नांदा ग्रामपंचायतीच्या सचिवाकडून आतातरी कारवाईची अपेक्षा नांदा ग्रामवासीयांना आहेत.
नांदा येथील व्यापारी रामअवतार नावधंर यांनी १९९८ मध्ये अतिक्रमण करुन सर्वे क्रमांक १४ जवळील वहिवाटीचा रस्ता बंद केला २०१८ मध्ये अनधिकृतपणे बेकायदा पहिल्या व दुसर्या मजल्याचे बांधकाम केले मे २०२० मध्ये लाकडाऊन चे काळात प्रकरण न्यायप्रविष्ट असतांनाही परत कुठलीही शासन परवानगी न घेता बेकायदा वाणिज्य वापरा करीता बांधकाम सुरु केले यासमंधाने तहसिलदार व ग्रामपंचायतीकडे तक्रार केल्यावरही न्याय मिळत नसल्याने ग्रामपंचायत सदस्या प्रिया राजदरकर यांनी चंद्रपूर तिला न्यायालयात दाद मागीतली न्यायालयाने दिनांक १४ आगस्ट रोजी बांधकाम करु नये असा मनाई हुकूम पारीत केला न्यायालयाच्या आदेशाचा सन्मान करून रामअवतार नावधंर यांनी शासन परवानगी घेऊन बांधकाम करणे गरजेचे होते परंतु न्यायालयाच्या आदेशातील शब्दांचा विपर्यास काढून नावधंर यांनी दिनांक २० आगस्ट पासुन परत त्याच बांधकामावर बांधकाम सुरु केले प्रशासन बांधकाम बंद करुन कारवाई करित नसल्याने नाईलाजास्तव ग्रामपंचायत सदस्या प्रिया राजगडकर आमरण उपोषण सुरु केले अखेर उपोषणाच्या चौथ्या दिवशी पंचायत समिती प्रशासन तहसीलदार व पोलीस प्रशासनाने दखल घेऊन उपोषणस्थळी भेट देऊन कारवाई करण्याचे लेखी आदेश दिल्याने तुर्तास उपोषण मागे घेण्यात आले आहे कोरपना पंचायत समितीच्या सभापती रुपाली ताई तोडासे , जिल्हा परिषद सदस्य शिवचंद्रजी काळे , पंचायत समिती सदस्य तथा माजी सभापती श्यामभाऊ रणदिवे , गटविकास अधिकारी बाबाराव पाचपाटील नायब तहसिलदार चिडे , पोलीस उपनिरीक्षक शिंदे , पंचायत विस्तार अधिकारी बैलनवारजी , ग्रामविकास अधिकारी पंढरीनाथ गेडाम या सर्व मान्यवरांनी लिंबुपाणी पाजुन उपोषणाची सांगता केली या प्रसंगी मान्यवरांनी मार्गदर्शन करून ठोस कारवाईचे आश्वासन दिले आहे .