Advertisements
कोरोना बातमीपत्र
चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कोरोना पॉझिटिव्हची संख्या 2547 झाली आहे. यापैकी 1249 बाधित बरे झाले आहेत तर 1269 जण उपचार घेत आहेत.
सोमवारी एकूण 203 बाधित पुढे आले आहेत. मागील 24 तासात पुन्हा 3 नागरिकांचा कोरोनाने मृत्यू झाला, त्यापैकी चंद्रपूर शहरातील बाबूपेठ वार्डातील 55 वर्षीय नागरिकाचा कोरोनाने 30 ऑगस्टला मृत्यू झाला, दुसरा मृत्यू उर्जानगर येथील 45 वर्षीय नागरिकाचा 30 ऑगस्टला मृत्यू झाला, तिसरा मृत्यू बल्लारपूर येथील गांधी वॉर्ड परिसरात राहणारे 65 वर्षीय नागरिकाचा कोरोनाने मृत्यू झाला.
एका मृतकाला कोरोनासह न्यूमोनियाचा आजार होता, अशी माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आतापर्यंत कोरोनामुळे 26 बाधितांचा मृत्यू झाला आहे.