चंद्रपूर मनपा अडचणीत असुनही लूट थांबत नाही – नगरसेवक पप्पू देशमुख यांचा आरोप

0
96
Advertisements

चंद्रपूर – संत मीराबाई सेवा सहकारी संस्था या संस्थेवर दोन वर्षांपूर्वी चंद्रपूरच्या ऊर्जा,उद्योग व कामगार विभागाचे सहाय्यक आयुक्त यांनी 38 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे.मात्र मनपाने आजपावेतो या कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकले नाही. उलटपक्षी मागील एक वर्षापासून याच दोषी कंत्राटदाराला मजूर पुरविण्याचे काम देऊन त्याला वारंवार मुदतवाढ देण्याचे बक्षीस मनपातील सत्ताधारी करीत आहेत आहेत. कचरा संकलन करणाऱ्या सीडीसी कंपनीने सात वर्षापासून कामगारांच्या विविध कायद्यांचे उल्लंघन केले.या बाबत तक्रार करूनही कारवाई झाली नाही. आता नव्याने घनकचरा संकलनाचे काम करण्यासाठी निविदा काढण्यात आली.मागच्या वेळी पाच वर्षासाठी हे काम देण्यात आले होते व दोन वर्षे मुदतवाढीची तरतूद करण्यात आली होती. मात्र आता थेट दहा वर्षासाठी महानगरपालिका घनकचरा संकलनाचे काम देणार आहे. उज्वल कन्स्ट्रक्शन सोबत नगरपालिकेने दहा वर्षांचा करार केला होता.या प्रकरणात मोठा मनस्ताप महानगरपालिकेला झाल्याचा अनुभव ताजा असताना घनकचरा संकलनासाठी दहा वर्षाचा करार करण्याचे कारण काय ?
कंत्राटदाराला लाभ पोहोचण्यासाठी दहा वर्षाचा करार करण्यात येत आहेत, आर्थिक अडचणीत आलेल्या मनपा मध्ये कंत्राटदार नियमबाह्य काम करून लूट करत आहेत व सत्ताधारी आणि प्रशासन त्यांना अभय देत आहेत असा आरोप नगरसेवक पप्पू देशमुख यांनी केला.
कोविड आपत्तीमध्ये डब्बे वाटप ,मास्क खरेदी, कॉल सेंटरवर जेवण पुरवठा इत्यादी अनेक कामातील भ्रष्टाचाराची चौकशी करण्याचे आश्वासन मागील आमसभेत महापौर राखी कंचर्लावार यांनी दिले होते. मात्र आजपावेतो कोणतीही कारवाई झाली नाही. याबाबत जनतेला माहिती देण्यात टाळाटाळ का करण्यात येत आहे असा सवाल देशमुख यांनी केला.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक दीपक जयस्वाल यांनी मालमत्ता मूल्यांकनाच्या कामाला दोन वर्षांची मुदतवाढ देण्यात यावी,नागरिकांची आर्थिक स्थिती गंभीर असल्याने रुपये 6.22 कोटी खर्च करून संपूर्ण मालमत्तांचे नव्याने मूल्यांकन करण्याचे काम स्थगित करण्यात यावे ,केवळ नव्याने तयार झालेल्या मालमत्तांचे मूल्यांकन करण्यात यावे अशी मागणी पुन्हा एकदा लावून धरली.
आजच्या सर्वसाधारण सभेत केवळ एकच महत्वपूर्ण विषय अजेंड्यावर घेण्यात आला होता. शहरांमध्ये कोविडचे संक्रमण वाढत आहे. परंतु अनेक नागरीक मास्कचा वापर करत नाहीत, गर्दीच्या ठिकाणी अंतर ठेवत नाहीत, जागोजागी थुकतात. यावर नियंत्रण ठेवण्याचे काम माजी सैनिकांच्या संस्थेला देण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला.त्यावर विरोधी पक्षनेते डॉ. सुरेश महाकुळकर, सुनिता लोढीया,नंदू नागरकर, विना खनके,सुरेश पचारे इत्यादी नगरसेवकांनी यांनी या कामाची योग्य अंमलबजावणी होईल, दुरुपयोग होणार नाही व जबाबदार नागरिकांना त्रास सुध्दा होणार नाही याची काळजी घेण्याची सूचना केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here