ऊर्जानगर येथे राष्ट्रसंत ऑगस्ट क्रांतीपर्व समारोह संपन्न

0
85
Advertisements

चंद्रपूर (ऊर्जानगर):-चातुर्मासाच्या कार्यक्रमात राष्ट्रसंतांनी ” झाड झडले शस्त्र बनेंगे,पत्थर सारे बॉम्ब बनेंगे,भक्त बनेगी सेना, नाव लगेगी किनारे” हे भजन म्हटल* व १६ ऑगस्ट १९४२ ला प्रचंड उद्रेकासह चिमूर वासियांनी पोलीस स्टेशन,तहसील कार्यालयावर चालून गेले.सर्कल इंस्पेक्टर जरासंध चा वध केला. कार्यालय पेटवून देण्यात आले इंग्रज सैनिकांना सळो कि पळो करून सोडले प्रचंड धुमश्‍चक्री उडाली.गोळीबार झाला,यातच १६ वर्षीय विद्यार्थी बालाजी रायपूरकर शहीद झाला. संगिनीला व बंदुकीच्या गोळीला न जुमानता चिमूर वासियांनी चिमुरला ब्रिटिशांच्या जोखडातून मुक्त केले. अशा प्रकारे *१६,१७ व १८ ऑगस्ट १९४२ असे तीन दिवस संपूर्ण स्वतंत्र झालेले देशातील पहिले गाव म्हणजे चिमूर होते.* चिमूर स्वातंत्र्य झाल्याची घोषणा नेताजी सुभाष सुभाष चंद्र बोस यांनी बर्लिन रेडिओवरून केली व संपूर्ण जगात चिमूर चे नाव अमर झाले.
अशा प्रकारे कोणतेही शस्त्र हाती न घेता राष्ट्रसंतांनी स्वातंत्र्यलढ्यात मौलिक असे योगदान दिले. त्यांची खंजिरी म्हणजेच ढाल होती.त्यांच्या शब्दाला तलवारीची धार होती. त्यांच्या आवाजात बंदुकीच्या गोळीचा वेग होता. त्यामुळे ब्रिटीश हादरले व त्यांना अटक करून तुरुंगात डांबले त्यांच्यावर खटला चालविला तरीदेखील राष्ट्रसंतांनी भजन, पोवाडे, लेख साहित्य या माध्यमातून आपले कार्य सतत सुरू ठेवले व अखेरीस आपला भारत १५ ऑगस्ट १९४७ ला पूर्ण स्वतंत्र झाले. यात राष्ट्रसंतांचा सिंहाचा वाटा आहे.
वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व अन्य क्रांतिवीरांच्या त्या त्यागाची,बलिदानाची आपल्याला व येणाऱ्या नवीन पिढीला विस्मरण होऊ नये, त्यांच्या विचारांचे पुनः बीजारोपण व्हावे या हेतूने
श्री गुरुदेव सेवा मंडळ, ऊर्जानगर चंद्रपूर च्या वतीने दरवर्षी राष्ट्रसंत आगस्ट क्रांतीपर्व समारोह हा कार्यक्रम दरवर्षी घेण्यात येतो यावर्षी वैश्विक महामारीच्या सावटामध्ये हा कार्यक्रम प्रत्यक्ष घेणे शक्य नसल्यामुळे कार्यक्रम खंडित होतो की काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती परंतु सर्वांचे सहकार्य परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेवून नुकताच गुगल मीट अप्सद्वारा ऑनलाईन पद्धतीने कार्यक्रम घेण्यात आला.
या ऑनलाइन कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय मुरलीधर गोहणे अध्यक्ष श्रीगुरुदेव सेवा मंडळ ऊर्जानगर यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगता मधून ऑगस्ट चिमूर क्रांतीचे सविस्तर असे वर्णन केले. ही क्रांती भारत स्वातंत्र्यमध्ये किती महत्वाची होती याची इत्यंभूत माहिती त्यांनी आपल्या अभ्यासपूर्ण विवेचना मधून दिली.
या कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक व वक्ते म्हणून लाभलेले माननीय सुबोध दादा संचालक भूवैकुंठ आत्मनुसंधन अड्याड टेकडी ब्रह्मपुरी,चंद्रपूर यांनी आपल्या ओजस्वी वाणीने राष्ट्रसंतांच्या स्वातंत्र्य लढ्या मधील योगदान तसेच समाज घडवण्यासाठी त्यांनी केलेल्या विविध कार्याचे सखोल विश्लेषण करून आजही समाजामध्ये असलेल्या काही अंधश्रद्धा,रूढी,परंपरा बेरोजगारी यावर राष्ट्रसंतांचे विचार त्यांनी केलेले कार्य कसे मात करू शकतात यावर सविस्तरपणे आपले विचार मांडले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन देवराव कोंडेकर यांनी केले. प्रमुख पाहुण्यांचे तसेच ऑनलाइन उपस्थितांचे स्वागत खेमदेव कन्नमवार यांनी केले. कार्यक्रमाची प्रस्तावणा विलास उगे सचिव,श्री गुरुदेव सेवा मंडळ ऊर्जानगर यांनी केली तर आभार शंकरजी दरेकर सेवाधीकारी यांनी मानले.
या कार्यक्रमाला बहुसंख्येने गुरुदेव प्रेमी ऑनलाइन पद्धतीने उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व गुरुदेव प्रेमींचे मोलाचे सहकार्य लाभले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here