कुपोषित मुलांना पोषण आहार कीट वितरण

0
67
Advertisements

गडचांदूर/सैय्यद मूम्ताज़ अली:-
चंद्रपूर जिल्ह्यातील औद्योगिक नगरी गडचांदूर येथील “कोवळी पानगळ” थांबावी यासाठी “गडचांदूरचा राजा” गणेश मंडळातर्फे परिवर्तन बाप्पा या मोहिमेंतर्गत गडचांदूर व लगतच्या परिसरातील 11 कुपोषित बालकांना पोषण आहार किटचे वितरण करण्यात आले असून सदर मंडळाने यासाठी पुढाकार घेतला.गडचांदूर येथे या अभियानाचे कौतुक होत आहे. सदृढ समाज निर्मितीसाठी कुपोषणमुक्त बालकांची गरज आहे.पोषण आहाराचा अभाव,घरातील अठराविश्व दारिद्र्य,योग्य मार्गदर्शनाचा अभाव,कुमारी मातांच्या प्रश्‍नांकडे होणारे दुर्लक्ष यातून कुपोषणाची समस्या पुढे येते.गडचांदूर व लगतचा परिसर कुपोषणमुक्त करण्याचा ध्यास घेऊन “परिवर्तन बाप्पा” अभियानात हा उपक्रम राबविण्यात आला.कोरपना तालुक्यात एकुण तिव्र व मध्यम असे 50 मुले कुपोषित आहे.त्यातील गडचांदुर 3,बिबी 2, राजूरगुडा 1, लखमापुर 1 व बाखर्डी येथील 2, सोनुर्ली 1, रामपूर 1 अशा 11 बालकांना जीवनसत्व देणारा आहार दैनंदिन मिळाला तर नक्कीच काही महिन्यात बालकांना कुपोषनातून साधारण श्रेणीत आणू शकतो. मध्यम व तिव्र कुपोषित बालकांना दोन महिन्याचा आहार पुरवठा मंडळातर्फे करण्यात आला. या पोषण आहार किटमध्ये आवश्यक हरभरा, मुग, वटाणे, बरबटी, गुळ, शेंगदाणे व मोट देण्यात आले.कुपोषण मुक्तीसाठीचे हे अभियान लोक सहभागातून असून समाजातील विविध स्तरातील नागरिकांनी मुलांना आहार पुरवठा करण्याकरिता सहकार्य केल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष अक्षय मेंढी यांनी दिली.विशेष अतिथी म्हणून उपस्थित असलेले नगरपरिषद उपाध्यक्ष शरद जोगी म्हणाले की,कुपोषित बालकांना योग्य पोषण आहार मिळावा म्हणून सामाजिक दायित्व जोपासत गडचांदूरचा राजा गणेश मंडळातर्फे सुरू झालेले हे अभियान प्रेरणादायी आहे. तर सचिन भोयर म्हणाले की, पालकांनी कुपोषित बालकाकडे दुर्लक्ष करू नये. त्यांना योग्य पोषण आहार द्यावा.पुढील 2 महिने पुरता देण्यात आलेल्या या पोषण आहार कीटचे निश्चित सकारात्मक परिणाम दिसतील.यावेळी नगरसेवक अरविंद मेश्राम,सामाजिक कार्यकर्ते प्रितम सातपुते,चंदु झुरमुरे,गणपत तुम्हाणे उपस्थित होते.गडचांदूरचा राजा गणेश मंडळाचे नितीन जगणाळे,महेश परचाके, राहुल सहारे,वैभव पारखी, ब्रम्हा देरकर,नितेश डाकोरे, मोहित बुटले,नूतन चौधरी यांनी विशेष मेहनत घेतली.
————————–//——————–
“गडचांदूरचा राजा गणेश मंडळाच्या वतीने होत असलेल्या या विधायक कामातून पंचक्रोशीतील बालक कुपोषणमुक्तीच्या दिशेने पाऊल टाकतील.असे मत सदर मंडळाचे सचिव सुयोग कोंगरे यांनी व्यक्त केले आहे. “

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here