आमदार जोरगेवार यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह

0
57
Advertisements

चंद्रपूर – राज्यात कोरोनाचा प्रसार झपाट्याने वाढत असताना सरकारने लॉकडाऊन घोषित केले होते, या कालखंडात चंद्रपूर शहरातील कडक लॉकडाऊन मध्ये एकमेव विधानसभा क्षेत्रात नागरिकांच्या लॉकडाऊन मध्ये समस्या जाणून घेणारा लोकनेता चंद्रपूर विधानसभा क्षेत्राचे आमदार किशोर जोरगेवार हे कोरोना पॉझिटिव्ह झाले.
लॉकडाऊन च्या भीषण काळात नागरिकांना अन्न वाटप, धान्य किट वाटप इतकेच नव्हे तर कंटेंटमेंट झोन मधील नागरिकांना भाजीपाला वाटपाचे काम आमदार जोरगेवार यांनी केले आहे.
जनतेच्या सेवेत नेहमी तत्पर असणारे आमदार जोरगेवार हे कमी वेळेतच नागरिकांच्या मनात घर करून बसले आहे, याबाबत आमदार जोरगेवार यांनी माहिती दिली की माझ्या विधानसभेतील जनता ही माझ्यावर प्रेम करणारी आहे, तुमचं प्रेम माझी शक्ती आहे या कोरोनाला हरवून मी लवकर पुन्हा जनसेवेत लागून आपल्या समस्या सोडविण्यासाठी येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here