चंद्रपूर जिल्ह्यातील लॉकडाऊन तूर्तास पुढे ढकलावे : आ. सुधीर मुनगंटीवार

0
111
Advertisements

चंद्रपूर – 1 ते 6 सप्टेंबर दरम्यान होणाऱ्या जेईई च्या परीक्षेच्या पार्श्वभूमीवर तसेच व्यापारी बांधव , हातावर पोट घेऊन जगणाऱ्या घटकांचे चंद्रपूर जिल्ह्यात 3 सप्टेंबर पासून सुरू होणारे लॉकडाऊन तूर्तास पुढे ढकलावे अशी मागणी माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी राज्याच्या मुख्य सचिवांकडे केली. याबाबत सकारात्मक कार्यवाहीचे आश्वासन मुख्य सचिवांनी आ. मुनगंटीवार यांना दिले.
जेईई च्या परीक्षेसंदर्भात लॉकडाऊनमुळे उदभवणाऱ्या अडचणीबाबत विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाने आ. सुधीर मुनगंटीवार यांची भेट घेतली. जेईई परीक्षा 1 ते 6 सप्टेंबर दरम्यान घेण्यात येणार आहे , लॉकडाऊन त्यात अनेक अडचणी विद्यार्थ्यांना सहन कराव्या लागतील असे विद्यार्थ्यांनी सांगितले .आ. मुनगंटीवार यांनी त्वरित मुख्य सचिवांशी सम्पर्क साधला व त्यांच्याशी चर्चा केली.जिल्ह्यात रुग्णसंख्या वाढत आहे ही निश्चितच चिंतेची बाब आहे मात्र जेईई च्या परीक्षे दरम्यान लॉकडाऊन केल्यास विद्यार्थ्यांची गैरसोय होईल .शिवाय व्यापारी बांधव व हातावर पोट घेऊन जगणाऱ्या नागरिकांना सुद्धा फटका बसेल .रुग्णसंख्या वाढत असल्यामुळे आरोग्य सुविधा वाढवाव्या , व्हेंटिलेटर्स ची संख्या वाढवावी . नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण व्हावी यासाठी जनजागरण अभियान हाती घ्यावे . लॉकडाऊन हा तात्पुरता उपाय असून त्या ऐवजी दीर्घकालीन उपाययोजना कराव्या. ज्या ठिकाणी रुग्णसंख्या लक्षणीय असेल त्याच ठिकाणी लॉकडाऊन करावे .सावधानीचे उपाय योजून कोरोनाचा सामना करण्यावर भर द्यावा असे सांगत आ. मुनगंटीवार यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील लॉकडाऊन तूर्तास पुढे ढकलण्याची मागणी केली. मुख सचिवांनी सकारात्मक कार्यवाही करण्याचे आश्वासन त्यांना या चर्चेदरम्यान दिले .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here