कोरोना संकटात पशुधनांवर “लम्पी” चे संकट, लसीकरणाची गती संथ

0
89
Advertisements

गडचांदूर/सैय्यद मूम्ताज़ अली:-
अख्ख्या जगात थैमान घालत असलेल्या “कोरोना” मुळे मानवी जीवन अक्षरशः धोक्यात आले असतानाच आता पशुंवरही “लम्पी” नामक आजाराचे संकटओढावलले आहे.कृषीप्रधान देश भारतातील अनेक राज्यांत हा आजार धूमाकुळ घालत असल्यामुळे पशुपालक बळीराजा आता दुहेरी संकटाच्या कात्रीत सापडला आहे. शहरी पेक्षा ग्रामीण क्षेत्रात याचा झपाट्याने फैलाव होताना दिसत असल्याने पशुधन धोक्यात आले आहे.यामुळे शेतकर्‍यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून लस नसल्याने ज्याप्रकारे कोरोनाची अवस्था आहे तशीच लम्पी आजाराची बनली आहे.शेळ्यांवरील माता आजाराची लस आता गाय,बैलांना देऊन परिस्थिती नियत्रंणात आणण्याचा शासनाचा प्रयत्न असला तरी राजूरा विधानसभा क्षेत्रात पशुधन विकास अधिकार्‍यांची अनेक पद रिक्त असल्याचे कळते.यामुळे अत्यंत संथगतीने लसीकरण मोहिम सुरु असून पशुधन नुकसानीचा धोका वाढल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले आहे. गोंडपिपरी,कोरपना,राजूरा,जिवती असे जवळपास 13 पशुधन विकास अधिकाऱ्यांची पदे रिक्त तसेच कोरपना येथील पंचायत समितीत पशुधन विस्तार ही पदास्थापना झालीच नसल्याची माहिती देण्यात आली आहे.यामुळे शेतकऱ्यांच्या हितांसाठीचा पशुसंवर्धन विभाग “पांढरा हत्ती” ठरत असल्याचे आरोप होत आहे.

“50 हजार पशुंसाठी 8 हजार लस….!”
कोरपना तालुक्यात दुधाळ व शेती उपयोगी जनावरे अंदाजे 50 हजारांच्यावर असून पशु उपचार केन्द्र वर्ग 1 व 2 आहे. कोरपना केंद्रावर 20 गावे असताना 800 डोज दिले.एकाच गावात 400 जनावरांचे लसीकरण झाले.कर्मचाऱ्यांच्या रिक्त जागेमुळे मोहिमेचे अक्षरशः तिन तेरा वाजल्याचे चित्र असून नियोजना अभावी पशुधन दगावण्याची धास्ती शेतकर्‍यांमघ्ये निर्माण होत आहे.”दुधाची तहान ताकावर” या म्हणीप्रमाणे प्रथम नियंत्रणाचे उपाय म्हणून शेळ्यांची लस सुद्धा कमी पडत असल्याने लसीकरण अभिमान नावापुरता ठरु नये यासाठी तात्काळ रिक्त पदे भरून लम्पी आजारासाठी लस उपलब्ध करून देण्यात यावी, पशुधन वाचविण्यासाठी प्रभावी यंत्रणा निर्माण करण्याची मागणी जनसत्याग्रह संघटनेचे सैय्यद आबीद अली यांनी पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांची भेट घेऊन केल्याची माहिती आहे. याचबरोबर जुमडे,रमेश डाखरे,संजय सिडाम, नेमीचंद काटकर, सुदर्शन आडे, इंदल राठोड,मंगेश गेडाम यांनी त्वरीत मोहिम राबवा अन्यथा आदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

Advertisements

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here