उपोषणाचा तिसरा दिवस, ” प्रशासनाचे दुर्लक्ष ” उपोषणकर्तीची प्रकृती खालावली

0
96
Advertisements

गणेश लोंढे/नांदाफाटा

नांदा – चंद्रपूर जिल्हा न्यायालयाचा बांधकामास मनाई आदेश आहे कुठलीही शासन परवानगी नाही असे असतांना रामअवतार नावधंर यांनी अतिक्रमीत जागेवर परत बांधकाम सुरुच ठेवले आहे २९ एप्रिल २०२० रोजीचे मासिक सभेत मुंबई ग्रामपंचायत अधिनियम १९५८ चे कलम ५३ अन्वये ग्रामपंचायत अनुपालन करुन कारवाई करित नसल्याने नांदा ग्रामपंचायत सदस्या प्रिया राजगडकर २८ ऑगस्टपासून आमरण उपोषण करीत आहे तहसीलदार गटविकास अधिकारी व ठाणेदार यांनी मागील तीन दिवसांपासून उपोषण स्थळी भेट देऊन दखल घेतलेली नाही स्थानिकांमध्ये रोष आहेत उपोषणकर्ती प्रिया राजगडकर यांची प्रकृती खालावलेली असून त्यांना रक्तदाब वाढलेला आहे ग्रामपंचायत कारवाई करीत नसल्याने गटविकास अधिकारी पंचायत समिती कोरपना यांनी उपोषणास्थळी भेट देऊन कारवाई करणे गरजेचे होते परंतु गटविकास अधिकारी मोबाईल उचलण्यास तयार नाही एकीकडे शासन महिलांच्या सशक्तीकरणा करीता मोठ्याप्रमाणात योजना राबविते तर दुसरीकडे शासकीय अधिकारी तीन दिवसापासून दुर्लक्ष करीत आहे तहसिलदार , गटविकास अधिकारी लक्ष देत नसल्याने वरिष्ठ अधिकार्‍यांनी लक्ष देऊन कारवाई करणे गरजेचे आहे.

Advertisements

नांदागावातील प्रत्येक नागरिक नावधंर यांनी अतिक्रमण केले असल्याची माहीती देत आहे उपसरपंच पुरुषोत्तम आस्वले व ग्रामपंचायतीच्या काही सदस्यांना नावधंर यांचे अतिक्रमण दिसत नसुन हेच नावधंरचे पाठीराखे बनले असल्याने न्यायासाठी महीला सदस्याला उपोषणाला बसावे लागते गावाच्या हिताचे काम करण्याच्या बाता करुन निवडून आलेले आता मात्र सत्तेचा दुरुपयोग करुन कारवाई करण्यास टाळाटाळ करीत आहे.

मारोती बुडे
सामाजिक कार्यकर्त्ये नांदा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here