नरभक्षी वाघाचा व अस्वलीचा बंदोबस्त करा – अन्यथा तिव्र आंदोलन

0
85
Advertisements

चंद्रपूर – सात जनांचा बळी घेणा-या वाघाचा व तसेच ३ जनांना घायाळ करणाऱ्या अस्वलीला जेरबंद करा. किंवा ठार मारा , अन्यथा फुले शाहु , आंबेडकर विचारमंच तोहोगाव सर्कल तसेच विरुर सर्कल तर्फे मा. जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मागणीचे निवेदन गोंडपिपरी तालुक्यातील धाबा तोहोगाव वनपरिक्षेत्र व राजुरा तालुक्यातील विरुर वनपरिक्षेत्रात पट्टेदार वाघाने ७ लोकांचा बळी घेणाऱ्या शेतकरी शेतमजुरांना जिवे मारले असुन तुळशिराम आत्राम कविठपेठ वाघांच्या हल्यात जखमी झाले आहे.अस्वलीच्या हल्ल्यात ३ लोकांना जखमी केले आहे. नरभक्षी वाघामुळे शेतकरी, शेतमजूर ,वनमजुर भयभीत झाले आहेत. या दोन्हीही सर्कल मध्ये धुमाकुळ माजविणाऱ्या नरभक्षी वाघाला व अस्वलीला त्वरीत जेरबंद करा किंवा जेरबंद होत नसेल तर ठार मारण्याची मागणी या निवेदनाव्दारे दोन्हीही सर्कल तर्फे मा.जिल्हाधिकारी यांच्या मार्फतीने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. उध्दव ठाकरे ,राज्याचे वनमंत्री मा. संजय राठोड, चंद्रपुर जिल्ह्याचे पालकमंत्री मा. विजयभाऊ वडेट्टीवार संबधीत महोदयांना या शिष्टमंडळाद्वारे दोन्ही सर्कलचे पदाधिकारी विजय ठेंगरे अध्यक्ष तोहोगाव, शनिदास खोब्रागडे अध्यक्ष विरुर, गोपाळराव देवगडे संस्थापक संचालक,गणपतराव उपरे, मधुभाऊ वानखेडे , अॅड.राजेश वनकर ,दिलीप वावरे प्रमुख मार्गदर्शक , समितीचे महासचिव राजेश डोडीवार तोहोगाव ,विरुर सर्कलचे महासचिव भारत उपरे, रमेश मेश्राम सचिव तोहोगाव सर्कल सत्यपाल दुर्गे,नरेश चहारे,संतोष उपरे इत्यादी उपस्थित होते.

‌ दोन्हीही सर्कल मध्ये धुमाकुळ घालणाऱ्या नरभक्षक वाघाला व अस्वलीला जेरबंद न केल्यास सप्टेंबरच्या पहील्या आठवड्यात जिल्हाधिकारी कार्यालयापुढे धरणे आंदोलन करण्याचा ईशारा देण्यात आला आहे.नरभक्षी वाघाचा धुमाकुळ या दोन्हीही सर्कल मध्ये सुरु आहे. शेतकऱ्यांना शेतामध्ये काम करणे कठीन झाले असुन वनमजुर ,शेतमजुर व मच्छीमार यांचा व्यवसाय बंद झाला असुन वाघाच्या दहशतीमुळे जंगलालगत शेती करणे शेतकऱ्यांसाठी जिवघेणे ठरत आहे. त्यांचा उदरनिर्वाह करण्याकरिता मोबदला देण्याता यावा अशी मागणी करण्यात येत आहे.

Advertisements

या दोन्हीही सर्कल मधील मृत्युमुखी झालेल्या त्यांच्या परिवाराला शासनाकडुन १५ लाख रु.एेवजी २५लाख रु. मोबदला (मदत) देण्यात यावा. तसेच ज्यांच्या परिवारातील कमावणारी व्यक्ती मृत्युपावल्यामुळे परिवारातील एका व्यक्तीस शासकीय सेवेत घेण्यात यावे. अशी विनंती करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here