हे उद्धवा अजब तुझे सरकार…! मदिरालय चालू धार्मिक स्थळे बंद

0
73
Advertisements

गडचांदूर/सैय्यद मूम्ताज़ अली:-
तालुका भाजपच्या वतीने 29 अॉगस्ट रोजी कोरपना बसस्थानक चौकात तालुकाध्यक्ष नारायण हिवरकर यांच्या नेतृत्वात “घंटानाद आंदोलन” करण्यात आले.”हे उद्धवा अजब तुझे सरकार” म्हणत राज्य सरकारने मदिरालय सुरू करण्यासाठी परवानगी दिली परंतू धार्मिक स्थळे उघडण्याची अजूनही परवानगी दिली नसल्याने जनतेत कमालीची नाराजी पहायला मिळत आहे.सरकारने जनतेच्या सहनशीलतेचा अंत न पाहता सगळी धार्मिक स्थळे तात्काळ उघडण्याची परवानगी द्यावी.याबाबत प्रदेश भाजपच्या सूचनेनुसार सदर आंदोलन करण्यात आले.यावेळी तालुकाध्यक्ष हिवरकर यांच्यासह नगरसेवक अमोल आसेकर,किशोर बावणे,पुरूषोत्तम भोंगळे,शशिकांत आडकीने,पवन मोहितकर,पद्माकर दगडी,पुंडलीक उलमाले,संजय टोंगे,अनील कौरासे,अभय डोहे,यशवंत इंगळे,दिनेश खडसे,जगदीश पिंपळकर,जय पवार इत्यादी भाजप पदाधिकारी,कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here