स्वतःच्या जीवाची पर्वा न करता या नगरसेवकाने दाखविला माणुसकीचा धर्म

0
89
Advertisements

चंद्रपूर – कोरोना विषाणूच्या विळख्यात जिल्ह्यातील 2000 नागरिक सापडले असताना 3 सप्टेंबर पासून चंद्रपूर शहरात कडक लॉकडाऊन करण्यात येणार आहे.
साधा ताप कुणाला आला की कोरोना झाला की काय अशी कुणकुण नागरिकांमध्ये सुरू होते, त्यावेळी समोरच्या व्यक्तीपासून नागरिक दूर जातात, परंतु कोरोनासारख्या विषाणूला न घाबरणारे काही नेते आपल्या शहरात आहे.
नगीनाबाग प्रभागातील महात्मा फुले चौकात एक इसम आजाराने त्रस्त होता.
परंतु त्याला दवाखान्यात नेण्याची माणुसकी कुणी दाखविली नाही, अश्यातच काहींनी प्रभागातील नगरसेवक स्थायी समिती सभापती राहुल पावडे यांना त्या इसमाबद्दल सूचना दिली असता ते तात्काळ महात्मा फुले चौक परिसरात पोहचले.
कोरोनाची भीती न बाळगता राहुल पावडे यांनी तात्काळ पीपीई किट घालत त्या इसमाला जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले.
स्वतःच्या जीवाची पर्वा न करता पावडे यांनी केलेले कार्य खरंच कौतुकास्पद आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here