चंद्रपूरातील बचतगटांची उत्पादने आता ॲमेझानवर

0
90
Advertisements

चंद्रपूर  : गावपातळीवर आपल्या गुणकौशल्यातून विविध नाविण्यपुर्ण उत्पादने निर्माण करणाऱ्या उमेद स्वयंसहायता समुहांना जागतिक बाजारपेठ मिळविण्याच्या दृष्टीने जिल्हयाने आणखी एक महत्वाचे पाउल टाकले आहेजिल्हातील उमेद समुहांची उत्पादने आता ॲमेझान या  कॉमर्स वेबसाईटवर उपलब्ध झाली आहेतदिनांक 29 ऑगस्ट रोजी नियोजन भवनात महाराष्ट्र राज्याचे मदत व पुनर्वसनआपत्ती व्यवस्थापनइतर मागासबहुजन कल्याणमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते औपचारिकरित्या या उत्पादनांना वेबसाईटवर प्रदर्शित करण्यात आले.

राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियानाची (उमेदअंमलबजावणी जिल्ह्यात सुरू आहेसदयस्थितीत जिल्हयात सुमारे 7200 समुह आहेया माध्यमातून ग्रामपंचायत स्तरावर 860 ग्रामसंघाची स्थापना करण्यात आली आहेतर 34 प्रभागसंघ तयार झाले आहेतअभियानाच्या माध्यमातून सुमारे 1 लाख 80 हजार कुटूंबे आपल्या विविध आर्थिक गरजा भागवत आहेतजिल्हयात विविध समुह अनेक उत्पादने तयार करीत आहेतयात कलाकुसरीच्या वस्तू , खादय उत्पादनेकाष्ठ शिल्पवनऔषधी आदीचा समावेश आहेसध्या या वस्तू जिल्हा  राज्य पातळीवरील प्रदर्शने तसेच स्थानिक स्तरावर विकल्या जात आहेतआता या उत्पादनांना जागतिक दर्जाच्या  कॉमर्स वेबसाईट ॲमेझान वर स्थान मिळाले आहे.

Advertisements

आज नियोजन भवनात झालेल्या कार्यक्रमास पालकमंत्री ना. विजय वडेट्टीवार यांच्या सह जिल्हाधिकारी अजय गुल्हानेमुख्य कार्यकारी अधिकारी तथा जिल्हा अभियान संचालक राहुल कर्डिले, अपर जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर आदीची प्रामुख्याने उपस्थिती होतीयाप्रसंगी बल्लारपूर तालुक्यातील कोठारीविसापूर येथील सुरभीझाशी राणी  जागृती या स्वयंसहायता समुहातील महिलांना ॲमेझान उत्पादनाचे पत्र देण्यात आले तसेच त्यांचा सत्कार करण्यात आलायाप्रसंगी ना. वडेटटीवार यांनी महिलांचे कौतुक करीत सदर वस्तू आता भारतभरातील ग्राहक खरेदी करतील आणि या माध्यमातून महिलांच्या आर्थिक उत्पन्नात भर पडेलअसा विश्वास व्यक्ती केलाजिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनीही यावेळी महिलांना शुभेच्छा दिल्याजिल्हा अभियान संचालक राहुल कर्डिले यांनी लवकरच ॲमेझानवरील उत्पादनांची संख्या वाढून 16 होईलअसे सांगितलेतसेच उमेद अभियानाच्या माध्यमातून स्वयंसहायता समुहांचे उत्पादने जिल्हा तसेच जिल्हास्तरावरील विक्री केंद्रातून उपलब्ध होतीलअसे सांगितले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा अभियान व्यवस्थापक गजानन ताजने यांनी केलेया कार्यक्रमाच्या आयोजनासाठी जिल्हा व्यवस्थापक संदीप घोंगेतालुका अभियान व्यवस्थापक उमपसुकेशीनी  गणवीर,माउलीकरसुहास वाडगुरे यांनी सहकार्य केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here