Advertisements
घुग्गुस – मागील 27 वर्षांपासून प्रलंबित असलेल्या घुग्गुस नगरपरिषदेला पालकमंत्री वडेट्टीवार यांनी हिरवी झंडी दाखवून दिली.
नेहमीच राजकीय पक्षातील राजकीय मंडळींनी घुग्गुस नगरपरिषद लवकर होणार असे आश्वासन देत निवडणूक जिंकली होती, परंतु ते आश्वासन नेहमीच हवेत विरले आज पालकमंत्री वडेट्टीवार यांनी स्वतः लक्ष देत ही मागणी पूर्ण करून घुग्गुस वासीयांना दिलेल्या आश्वासनाची पूर्तता केली म्हणजेच घुग्गुस वासीयांचा 27 वर्षाचा वनवास अखेर संपला.