कोरपन्यातील समस्या घेऊन विरोधी नगरसेवक आंदोलनाच्या पवित्र्यात

0
61
Advertisements

गडचांदूर/सैय्यद मूम्ताज़ अली:-
कोरपना नगर पंचायतच्या सर्वसाधारण सभेत स्वीकृत सदस्य हस्तक्षेप करीत असल्याने सभेत सविस्तर चर्चा केली जात नाही तसेच विरोधी नगरसेवकांच्या समस्या सभागृहात समजून घेतल्या जात नसल्याने आपल्या प्रभागातील समस्यांची मांडणी कोणाकडे करायची असा प्रश्न विरोधी नगरसेवकांनी मुख्याधिकाऱ्यांची भेट घेऊन उपस्थित केला असून झालेल्या सभेवर विरोध दर्शवून बहिष्कार घातला आहे.
नवीन अभ्यासिका येथे 28 अॉगस्ट रोजी नगरपंचायतची सर्वसाधारण सभा 28 अॉगस्ट रोजी नवीन आयोजित करण्यात आली होती.परंतु वेळेवर व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे सभा घेण्यात आली.यासभेत विषय सूचीनुसार चर्चा होणे गरजेचे आहे.परंतु सभेत स्वीकृत नगरसेवक नेहमीप्रमाणे नगराध्यक्षांचे अधिकार वापरून सभेत प्रत्येक विषयात हस्तक्षेप करीत असल्याने सभेत योग्य चर्चा होऊ शकली नाही.विरोधी नगरसेवकाला शहरातील विविध समस्या मांडण्यास विरोध करून लवकरच सभा गुंडाळण्यात आली.त्यामुळे विरोधी नगरसेवकांनी सर्वसाधारण सभेवर बहिष्कार घालून सभा संपल्यानंतर मुख्यधिकारी यांची भेट घेऊन सभेत झालेल्या चर्चा बाबत विरोध दर्शविला आहे.
कोरपना शहरात सध्या अनेक समस्या आवासून उभ्या आहे परंतु याकडे नगरपंचायत तर्फे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जाते.शहरातील विविध समस्यांबाबत अनेकदा विरोधी नागरसेवकांकडून तक्रार केली जाते परंतु त्या तक्रारीची कोणतीही दखल घेतली जात नाही. अशाप्रकारे सर्वसाधारण सभेतही विरोधी नगरसेवकांचा आवाज दाबला जात असेल तर शहरातील समस्या सोडविण्यासाठी रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करण्याचा इशारा नगर सेवक अमोल आसेकर,सुहेल अली,सुभाष तुराणकर,रेखा चन्ने यांनी दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here