बिबी ग्रा.पं.तर्फे 5 हजार नागरिकांना “मास्क” चे वाटप सुरू

0
109
Advertisements

गडचांदूर/सैय्यद मूम्ताज़ अली:-
कोरोना संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता कोरपना तालुक्यातील जिल्हा स्मार्ट ग्राम बिबी ग्रामपंचायततर्फे 5 हजार नागरिकांना 28 जुलैपासून मास्क वितरणाला प्रारंभ करण्यात आला आहे.बिबी गटग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या बिबी,धामणगाव, नैतामगुडा,आसन(बु.)व गेडामगुडा येथील सर्व नागरिकांना हे मास्क वितरीत करण्यात येणार असल्याची माहीती देण्यात आली असून बिबी ग्रा.पं.च्या वतीने नेहमी आरोग्यविषयक उपक्रम राबविण्यात येतात हे मात्र विशेष.यावेळी सरपंच मंगलदास गेडाम,उपसरपंच आशिष देरकर,ग्रा.पं.सदस्य नरेंद्र अल्ली,संगीता ठाकरे,ग्रामविकास अधिकारी प्रताप ढुमणे, शेख रहीम,कर्मचारी सुनील करसंगे,अनिल आत्राम,रामकीसन कुळमेथे,मारोती घोडाम आदींची उपस्थिती होती.
——————–///—————————
“खेड्यापाड्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे गावकऱ्यांमध्ये जनजागृती करण्याकरिता ग्रामपंचायतच्या वतीने मास्कचे वितरण करण्यात येत आहे. नागरिकांनी नियमितपणे मास्कचा वापर करावा असे आवाहन बिबी ग्रामपंचायतचे उपसरपंच आशिष देरकर यांनी News34 च्या माध्यमातून केला आहे.”
———————///————————–

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here