गडचांदूर/सैय्यद मूम्ताज़ अली:-
पानठेला(पानटपरी)चालवून आपल्या कुटुंबाचे पालनपोषण करणारे छोटे व्यावसायीक “कोरोना” च्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमुळे आर्थिकदृष्ट्या अडचणीत सापडले असून अक्षरशः उपासमारीचे संकट कोसळले आहे.नोकरी नाही,शोधले तरी काम मिळत नाही,सहा महिन्यांचा कालावधी लोटत आहे.कुटुंबाचे पालनपोषण कसे करायचे असा प्रश्न निर्माण झाला असून अक्षरशः जगने कठीण झाले आहे.साहेब जरा आमच्याही बाबतीत विचार करा अशी कळकळीची विनंती गोरगरीब बेरोजगार पानठेले चालकांनी News34 च्या माध्यमातून जिल्ह्याचे पालकमंत्री ना.विजय वडेट्टीवार यांच्याकडे केली आहे.शासनाचे सर्व नियम व अटी-शर्ती आम्हांस मान्य पण आमचे व्यवसाय सुरू करण्यासाठी मदत करा.मुलांचे भविष्य,मुलींचे लग्न,बिमार आई-वडील यांचं कसं होणार याच विवंचनेत रात्रभर झोप येत नाही.आगोदरच बेरोजगारी वाढल्याने दुसरे काम मिळत नाही सांगा काय करायचे.या कोरोनाने आम्हाला अक्षरशः देशोधडीला लावले,काय करावे काहीच समजत नाही.अशी बिकट परिस्थिती निर्माण झाली असून यवतमाळचे जिल्हाधिकारी यांनी अटी, शर्ती घालून तेथील पानठेले सुरू करण्याची परवानगी दिली.याचप्रमाणे आम्हाला ही आमचे व्यवसाय सुरू करण्यासाठी मदत करा.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याची दारुबंदी उठविण्यासाठी आपले प्रयत्न सुरू आहे.याचबरोबर आमच्याही पोटापाण्याचा बघा अशी कळकळीची विनंती गडचांदूरातील तरूण व इतर काही पानठेले चालकांनी केली आहे.आता पालकमंत्री यांच्या हाकेला कितपत न्याय देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
अहो साहेब….! जरा आमच्याही पोटापाण्याचं बघाजी
Advertisements