रस्त्यावर उभी वाहने देत आहे दुर्घटनेला आमंत्रण

0
119
Advertisements

गडचांदूर/सैय्यद मूम्ताज़ अली:-
“कोरोना” च्या पार्श्वभूमीवर गडचांदूर शहर परिसरातील सिमेंट कंपन्यामधुन सिमेंटची वाहतूक करणारी मोठमोठी वाहने चक्क रस्त्याच्या कडेलाच उभी केली जात आहे.याकडे पोलिसांचे दुर्लक्ष होताना दिसत असून नागरिकांना अक्षरशः जीवमुठीत घेऊन ये-जा करावी लागत आहे. माणिकगड सिमेंट गेट समोरील रस्ता,अंबुजा फाटा याठिकाणच्या वाहनांबद्दल अनेकदा तक्रार करूनही काहीच परिणाम झाला नाही.मोटार ट्रांस्पोर्ट विषयी स्थानिक पोलिस प्रशासनाने अघोषित मौन पाळल्याचे चित्र असून आजपर्यंत निव्वळ थातूरमातूर कारवाई शिवाय दुसरे काहीच घडले नाही.ही शोकांतिका असून येथील वाहनांमुळे आगोदरच सर्वसामान्यांचा जीव टांगणीला असताना आता यावर राजूराकडे जाणाऱ्या मुख्य मार्गाच्या दोन्ही बाजूला उभी मोठमोठ्या वाहनांची भर पडली आहे.येथील सारंग पेट्रोल पंपच्या बाजूला एका ट्रांस्पोर्टची वाहने चक्क मुख्य मार्गाच्या दोन्ही बाजूला उभी असल्याने एकतर यामार्गावरील टीचर कॉलनीतील नागरिकांना मोठ्याप्रमाणात मनस्ताप सहन करावा लागत आहे तर दुसरीकडे सदर रस्ता नॅशनल हायवे असल्याने 24 तास यावरून वाहनाची वर्दळ सुरू असते.याठिकाणी उभ्या वाहनांमुळे भविष्यात मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नसून नागरिकांच्या जीवास धोका निर्माण झाला आहे.पोलिस अधिकारी,कर्मचारी नेहमी हे चित्र पाहतात मात्र यावर अंकुश का घालत नाही हा मात्र संशोधनाचा विषय बनला आहे.भविष्यातील अपघात टाळण्यासाठी सदर रस्त्यावरील उभ्या वाहनांचा त्वरित बंदोबस्त करून रस्ता मोकळा करावा अशी मागणी होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here